छगन भुजबळांना 5 महिन्यानंतर ‘चैना’, आज घेणार मंत्रिपदाची शपथ:मंत्रिपद हुकल्यावर म्हणाले होते… जहाँ नही चैना, वहाँ नही रहेना

ओबीसी नेते, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ 20 मे रोजी सकाळी 10 वाजता मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्यांना धनंजय मुंडेंकडील अन्न व नागरी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबर 2024 रोजी महायुती मंत्रिमंडळाचा नागपुरात शपथविधी झाला. त्यातून आपल्याला वगळण्यात आल्याचे कळताच संतप्त झालेले छगन भुजबळ नागपूर बाहेर पडले. जाताना त्यांनी ‘जहाँ नही चैना, वहाँ नही रहेना’ अशी हिंदी सिनेमातील लोकप्रिय गीताची ओळ म्हणत नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून ते मंत्रिपदासाठी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आगामी मनपा, जि.प. च्या निवडणुकीत आेबीसी मतांचे महत्त्व लक्षात घेवून भुजबळांचे पुनरागमन करून घेण्यात आल्याचे दिसते.