छत्रपती संभाजीनगरमधील VITS हॉटेल प्रकरण:हॉटेलचा खरा मालक कोण? पहिला लिलाव कधी झाला? वाचा सविस्तर संपूर्ण माहिती

छत्रपती संभाजीनगरमधील VITS हॉटेल प्रकरण:हॉटेलचा खरा मालक कोण? पहिला लिलाव कधी झाला? वाचा सविस्तर संपूर्ण माहिती

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचा आरोप होत असल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या हॉटेलची बाजारभावानुसार किंमत सुमारे 110 कोटी रुपये असताना, केवळ 67 कोटी रुपयांत हे हॉटेल शिरसाट यांच्या मुलाने खरेदी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले असून, लिलाव प्रक्रियेतील पारदर्शकतेचा दावा केला आहे. हे प्रकरण पुढे जात असताना, आता महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे की विट्स हॉटेलचा खरा मालक कोण आहे? आणि या ऑक्शनमागील नेमका इतिहास काय आहे? विट्स हॉटेलचे मूळ मालक रमेश हवेली विट्स हॉटेल हे मूळतः रमेश हवेली यांच्या मालकीचे असून, त्यांनी धनदा कॉर्पोरेशन या नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीचे शेअर्स त्यांनी बाजारात विकले आणि गुंतवणूकदारांना ठराविक परतावा देण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला काही काळ परतावा दिला गेला, मात्र नंतर कंपनीने बँक करप्ट झाल्याचे सांगत परतावा देणे थांबवले. यामुळे शेअर्स धारकांनी विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली. शासनाने या तक्रारीची दखल घेत गॅझेट नोटिफिकेशनद्वारे संबंधित मालमत्ता जप्त (अटॅच) केली. 2018 साली एमपीआयडी (MPID) कायदा लागू करत छत्रपती संभाजीनगर भागातील उपविभागीय अधिकाऱ्यांना (SDM) सक्षम अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांची ही नियुक्ती विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेसाठीच करण्यात आली होती. 2018 मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार, पुण्याचे नितीन एम. लेले यांनी विट्स हॉटेलच्या मालमत्तेचे मूल्यांकन केले. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, त्या वेळची बाजारभावानुसार किंमत 85 कोटी 92 लाख रुपये होती. मात्र, प्रत्यक्षात मिळू शकणारा मूल्य 64 कोटी 53 लाख रुपये इतका असू शकतो, असे त्यांनी नमूद केले. 2019 मध्ये या प्रॉपर्टीचा पहिला लिलाव त्यानंतर 2019 मध्ये या प्रॉपर्टीचा पहिला लिलाव जाहीर करण्यात आला. त्यावेळी लिलावासाठी किमान रक्कम 76 कोटी रुपये ठेवण्यात आली होती. मात्र, या लिलावात एकही बोलीदार सहभागी झाला नाही. त्याच वर्षी दुसऱ्यांदा लिलाव काढण्यात आला आणि यावेळी किमान किंमत 64 कोटी 53 लाख रुपये ठेवण्यात आली. तरीही लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर 2021 मध्ये तिसऱ्यांदा त्याच किंमतीवर (64 कोटी 53 लाख रुपये) लिलाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या लिलावालाही कोणीही प्रतिसाद दिला नाही. प्रॉपर्टीचे दोन हिस्से करण्याची मागणी फेब्रुवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा एसडीएम कार्यालयाकडून लिलाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, यावेळीही मालमत्तेची किमान किंमत 64 कोटी 53 लाख रुपये ठेवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर एका ठेवीदाराने न्यायालयात अर्ज दाखल करून प्रॉपर्टीचे दोन हिस्से करण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत हॉटेलसमोरील रिकामी जागा आणि हॉटेलची इमारत असे दोन स्वतंत्र भाग करण्यात आले. त्यानुसार हॉटेलच्या लॉनची किंमत 17 कोटी 67 लाख आणि इमारतीची किंमत 46 कोटी 85 लाख रुपये निश्चित करण्यात आली. यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये या नव्या मूल्यांकनानुसार पुन्हा लिलावासाठी नोटीस काढण्यात आली, मात्र या वेळीही कोणताही इच्छुक बोलीदार पुढे आला नाही. लिलावाला स्थगिती देण्याची मागणी यानंतर या प्रकरणात सहावा लिलाव डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आला, परंतु त्यातही कोणतीही बोली लागली नाही. त्यानंतर मे 2025 मध्ये सातव्या लिलावाची घोषणा करण्यात आली आणि यावेळीही किमान किंमत 64 कोटी 53 लाख रुपये ठेवण्यात आली. या लिलावासाठी 20 मे रोजी तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, मूळ मालक रमेश हवेली यांनी लिलावाला स्थगिती देण्याची मागणी करत विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यांनी आपल्या अर्जात मालमत्ता अत्यल्प किमतीत विकली जात असल्याचा आरोप करत लिलाव थांबवण्याची विनंती केली. 20 मे रोजी झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने रमेश हवेली यांचा अर्ज फेटाळून लावला आणि लिलाव पुढे सुरू ठेवण्याची परवानगी दिली. सर्वाधिक बोली संजय शिरसाटांच्या मुलाने लावली संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या ‘सिद्धांत मटेरियल प्रोक्योरमेंट अँड सप्लाइज’ या कंपनीने सर्वाधिक बोली लावत रिकाम्या जागेसाठी 17 कोटी 82 लाख 66 हजार आणि हॉटेलसाठी 47 कोटी 56 हजार, अशी एकूण 64 कोटी 83 लाख रुपयांची ऑफर दिली. दुसऱ्या क्रमांकावर लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम्स होते, ज्यांनी रिकाम्या जागेसाठी 17 कोटी 77 लाख 66 हजार 408 आणि हॉटेलसाठी 46 कोटी 95 लाख 56 हजार अशी एकूण 64 कोटी 72 लाख रुपयांची बोली लावली. तिसऱ्या क्रमांकावर कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड होते, ज्यांची एकूण बोली 64 कोटी 62 लाख रुपये होती. सर्वाधिक बोली सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीची असल्याने हॉटेल देण्याची प्रक्रिया त्यांच्या बाजूने सुरू झाली आहे. त्यासाठी त्यांना बोलीच्या 25 टक्के रक्कम 21 तारखेपर्यंत भरावी लागणार असून उर्वरित 75 टक्के रक्कम पुढील 90 दिवसांत भरावी लागेल. त्यानंतर हे हॉटेल अधिकृतपणे त्यांच्या मालकीचे होईल.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment