छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजना:मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, ऑक्टोबर 2025 ची दिली डेडलाइन

छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजना:मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, ऑक्टोबर 2025 ची दिली डेडलाइन

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आता संभाजीनगरच्या पाणीप्रश्नाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. संबंधित पाणीपुरवठा योजनेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबर 2025 डेडलाइन लाईन दिली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी 2 हजार 740 कोटी रुपयांची पाणी पुरवठा मंजूर झालेली आहे. मात्र, ही योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित असून योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरावासियांना पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. शहरात सध्या 7-8 दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. संभाजीनगरच्या पाणीप्रश्नासाठी विविध पक्षांकडून अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. मात्र, शहराचा पाणीप्रश्न काही सुटला नाही. आज सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर 2025 पर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. योजनेच्या कामात हयगय चालणार नाही सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पाणी पुरवठा योजनेसंदर्भात अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. महापालिकेने ही आपली योजना आहे, असे समजून प्रत्येक टप्प्यावर पुढाकार घ्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच अधिकाऱ्यांच्या टास्क फोर्स तयार करण्याच्या सूचनाही दिल्या. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबर 2025 ची डेडलाइन दिली आहे. कंत्राटदार कामे करत नसतील, तर त्यांना काळ्या यादीत टाका, अशा सूचनाही देत या योजनेच्या कामात कोणतीही हयगय चालणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. टप्पा हुकल्यास पाण्याची अडचण दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पाणी नाही ही अडचण नाही, मात्र पाण्यासाठी वितरण व्यवस्था सक्षम नाही ही अडचण आहे. 50 वर्षे जुन्या योजनेवर पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे जलवाहिनी फुटून पाणीटंचाई निर्माण होते. सध्या काही भागात 6 दिवसांआड तर काही ठिकाणी 8 ते 9 दिवसांनी पाणी येते. मात्र पाणीपुरवठ्याचा टप्पा हुकल्यास पाण्याची अडचण निर्माण होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment