छत्रपती शिवराय सर्वधर्मीय नव्हते:संभाजी भिडे यांचा दावा, म्हणाले – महाराजांसह शंभूराजांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांसह शंभूराजेंनी हिंदवी स्वराज्याचा मांडला आहे, आपल्याकडील शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत हे सर्व चुकीचा इतिहास मांडत आहेत, असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. संभाजी भिडे पुढे बोलताना म्हणाले की पक्ष, संघटना शिवरायांच्या नावाचा स्वार्थासाठी वापर करत आहेत. खरे तर छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे या मताचे होते. त्यात त्यांना यश आले नाही, पण त्यांचा विचार पुढे आणला तो शिवरायांनी. शनिवारी सांगलीत मूक पदयात्रा संभाजी भिडे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी यांनी बलिदान दिले. सध्या छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून बलिदान मास पाळला जात आहे. यासाठी शनिवारी सांगलीतील शिवाजी महाराज पुतळ्यापासून सकाळी साडेसात वाजता मूक पदयात्रा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हिंदूची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य संभाजी भिडे म्हणाले की, शहाजीराजे म्हणाले होते की, मला स्वत:ला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे आहे. मला स्वतंत्र राज्य निर्माण करायचे आहे. हिंदू… हिंदू… हिंदू समाज, हिंदू संस्कृती यांच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे आहे, असे म्हटले होते. रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा आवश्यक संभाजी भिडे म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे जे बोलत आहेत, ते 100 टक्के चूक आहे. वाघ्याची जी कथा सांगितली जाते, ती सत्य आहे. आज माणसे जेवढी एकनिष्ठ नसतात, तेवढी त्याकाळी कुत्री होती. हे दाखवण्यासाठी रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा आवश्यक आहे. तर आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहणे गरजेचे आहे. त्याचे प्रतीक म्हणून वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावर राहिला पाहिजे. स्वार्थासाठी कशीही मतं बदलणाऱ्या माणसांना माझं मत पटणार नाही. मनोहर भिडे फार मोठे इतिहासकार- राऊत संजय राऊत म्हणाले की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा मनोहर भिडे आणि संभाजीराजे यांनी एकत्र बसून सोडवावा. महाराष्ट्राला त्यात ओढू नये. शिवरायांच्या बरोबरचे सर्व जण एकनिष्ठ होते. काही दाखल्याचे खोदकाम इतक्या वर्षांनी करणे काही योग्य नाही. संदर्भाला ऐतिहासिक पुरावे नसले तरी ते भावनिक स्वीकारलेले असतात. मनोहर भिडे फार मोठे इतिहासकार आहेत, अशी उपहासात्मक टोलेबाजीही त्यांनी केली. वाचा सविस्तर