मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार:बाळासाहेब थोरात यांचा दावा, मविआत वाद होण्याची शक्यता; आम्ही शर्यतीत नाही, सुप्रिया सुळेंची स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार:बाळासाहेब थोरात यांचा दावा, मविआत वाद होण्याची शक्यता; आम्ही शर्यतीत नाही, सुप्रिया सुळेंची स्पष्टोक्ती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून चांगलेच महाभारत रंगले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यापूर्वीच अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही राज्यातील या सर्वोच्च पदावर काँग्रेसचा दावा केला आहे. या दोन्ही पक्षांच्या भूमिकेनंतर आता शरद पवार गटाने सावध भूमिका घेत या शर्यतीपासून आपण दूर असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने यासाठी जय्यत तयारी केली आहे. मविआतील ठाकरे गटाने यापूर्वीच मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. विशेषतः त्यांनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने फेटाळली. त्यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रीपदावर आपल्या पक्षाचा दावा सांगितला आहे. बाळासाहेब थोरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, महाराष्ट्रातील जवळपास सर्व बैठका आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. संपूर्ण राज्यात काँग्रेस व महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील अशी चिन्हे आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी आमचीही इच्छा आहे. त्यात आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही. हा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. बाळासाहेब थोरात यांची भूमिका गैर नाही -सुप्रिया सुळे बाळासाहेब थोरात यांच्या या विधानातून काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे, पत्रकारांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना छेडले असता त्यांनी थोरात यांच्या भूमिकेत काहीही गैर नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक पक्षाला व कार्यकर्त्याला आपला नेता व आपला पक्ष मोठा व्हावा असे वाटते. त्यात काहीही गैर नाही, असे त्या म्हणाल्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवार गट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही का? असा थेट प्रश्न केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी नकारात्मक उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2 आठवड्यांपूर्वीच या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही कोणत्याही शर्यतीत नाही, असे ते म्हणाले होते, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. हे ही वाचा… विजय शिवतारे यांचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार?:माजी IPS शिवदीप लांडे बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता मुंबई – बिहारची माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात जाण्याची शक्यता आहे. शिवदीप लांडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी गुरुवारी आपल्या आयपीएस पदाचा राजीनामा दिला होता. ते बिहारमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. वाचा सविस्तर

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून चांगलेच महाभारत रंगले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यापूर्वीच अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही राज्यातील या सर्वोच्च पदावर काँग्रेसचा दावा केला आहे. या दोन्ही पक्षांच्या भूमिकेनंतर आता शरद पवार गटाने सावध भूमिका घेत या शर्यतीपासून आपण दूर असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने यासाठी जय्यत तयारी केली आहे. मविआतील ठाकरे गटाने यापूर्वीच मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. विशेषतः त्यांनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने फेटाळली. त्यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रीपदावर आपल्या पक्षाचा दावा सांगितला आहे. बाळासाहेब थोरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, महाराष्ट्रातील जवळपास सर्व बैठका आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. संपूर्ण राज्यात काँग्रेस व महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील अशी चिन्हे आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी आमचीही इच्छा आहे. त्यात आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही. हा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. बाळासाहेब थोरात यांची भूमिका गैर नाही -सुप्रिया सुळे बाळासाहेब थोरात यांच्या या विधानातून काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे, पत्रकारांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना छेडले असता त्यांनी थोरात यांच्या भूमिकेत काहीही गैर नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक पक्षाला व कार्यकर्त्याला आपला नेता व आपला पक्ष मोठा व्हावा असे वाटते. त्यात काहीही गैर नाही, असे त्या म्हणाल्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवार गट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही का? असा थेट प्रश्न केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी नकारात्मक उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2 आठवड्यांपूर्वीच या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही कोणत्याही शर्यतीत नाही, असे ते म्हणाले होते, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. हे ही वाचा… विजय शिवतारे यांचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार?:माजी IPS शिवदीप लांडे बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता मुंबई – बिहारची माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात जाण्याची शक्यता आहे. शिवदीप लांडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी गुरुवारी आपल्या आयपीएस पदाचा राजीनामा दिला होता. ते बिहारमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. वाचा सविस्तर  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment