मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवले काळे झेंडे:ताफ्याला रोखण्याचाही प्रयत्न; ठाकरे यांच्या गटाचे कार्यकर्ते असल्याचा दावा
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. अशा स्थितीत ठिकठिकाणी राजकीय पक्षांच्या नेत्यांचा निवडणूक प्रचारही शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, मुंबईत काही लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवले. त्यांच्या ताफ्याला रोखण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार दिलीप लांडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. निवडणूक प्रचार आटोपून परतत असताना काही लोकांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांनी मुख्यमंत्र्यांचे वाहन रोखण्याचा प्रयत्न केला ते उद्धव ठाकरे यांच्या गटाचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल शिवसेनेचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या प्रचारासाठी वैजापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित केले. या दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुस्लिम व्होट बँक मिळाली असे वाटत असेल पण ती लवकरच विस्कळीत होईल, असा दावा शिंदे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘मशाल’ हे घरे पेटवण्याचे आणि समाजात तेढ निर्माण करण्याचे माध्यम असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. एकनाथ शिंदे म्हणाले की, “ते मशालीला क्रांतीचे प्रतीक म्हणतात, पण त्यांची मशाल घरे जाळते आणि समाजात तेढ निर्माण करते. त्यांच्या बाजूने वाढणारी मुस्लिम मते लवकरच विखुरली जातील.” 20 नोव्हेंबर रोजी मतदान महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत असली तरी वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि तिसऱ्या परिवर्तन आघाडीचे उमेदवार देखील अनेक मतदारसंघात युती आणि आघाडीचे गणित बिघडवण्याची शक्यता आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. एकनाथ शिंदे-माझ्याही बॅगा तपासल्या गेल्या:अजित पवारांचे विरोधकांना प्रत्युत्तर; तर रवी राणांवर ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणत केली टीका लोकांना फार नकारात्मक बोललेले आवडत नाही. जनता फार सकारात्मक विचार करत असते. आम्ही देखील एकेकाळे राणांचे समर्थन केले आहे. पण राणा यांनीच स्वतःच्या बोलण्यातूनच पत्नीचा पराभव करून घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. रवी राणा यांनी आता तरी बोलताना काळजी घ्यायला हवी. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात देखील उमेदवार दिला आहे. त्यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. त्यांना समजून सांगायला हवे, अशा शब्दात अजित पवारांनी राणांवर निशाणा साधला. रवी राणांची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झाली असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…. राम मंदिर निर्माणातील मोदींचा ‘राजकीय इंटरेस्ट’ संपला:त्यामुळे भाजपने देव फिरवला; रामाचा नवा वनवास सुरू झाला आहे काय? ठाकरे गटाचा निशाणा राममंदिराचे राजकारणच चालत नाही म्हटल्यावर मोदी–शहांच्या तोंडून रामनाम येणेही बंद झाले. लोकसभा निकालानंतर मोदी एकदाही अयोध्येत गेले नाहीत. राम मंदिर निर्माणातील मोदींचा ‘राजकीय इंटरेस्ट’ संपल्याचा परिणाम असा झाला की, राममंदिराचे काम रखडून पडले. मोदी साहेबांनी देव बदलला. त्यामुळे भाजपने देव फिरवला. श्रीराम पुन्हा वनवासी होतात की काय, अशी भीती त्यामुळे निर्माण झाली. रामाची निवास व्यवस्था अपुरी आहे. रामाचे छत गळते आहे व घराला कुंपण नाही. दरबाराचे कामही अपूर्ण. त्यामुळे रामाची अवस्था अवघडल्यासारखी झाली. दिल्लीच्या राजाने देव बदलल्याचा फटका अयोध्येच्या राजाला बसला. भाजपला आता श्रीराम नकोसे झाले! रामाचा नवा वनवास सुरू झाला आहे काय? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. या बाबत ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून भाजपवर आणि मोदींवर निशाणा साधला. पूर्ण बातमी वाचा… उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘बाण’ निघून गेला, आता फक्त ‘खान’ उरला:मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता ठाकरे गटाच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ खान राहिले आहेत, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पूर्ण बातमी वाचा… उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरेंनी भान ठेवावे:संजय राऊत यांचा निशाणा; गुजराती व्यापाऱ्यांची स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांनी भान ठेवावे, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे हे गुजरामधील दोन व्यापाऱ्यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. त्यांच्यावर राज ठाकरे हे टीका करर असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोग निष्पक्ष पणे वागत नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. पूर्ण बातमी वाचा…