अधिवेशनाचा अकरावा दिवस:अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा आणि मतदान; नागपूर हिंसाचारावर विरोधक आक्रमक

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अकरावा दिवस आहे. आज अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा होणार असून यावर मतदान देखील घेण्यात येणार आहे. दरम्यान नागपूर येथे झालेल्या हिंसाचारानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे हा मुद्दा देखील आज विधिमंडळातील दोन्ही सभागृहात गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.