आता चारधाम दर्शनासाठी हेलिकॉप्टर सेवा देण्याची तयारी:लवकरच मंजुरी, उत्तराखंडमध्ये तीन नवीन हेलिपॅडसाठी केले सर्वेक्षण, तपासणीही केली पूर्ण

आता चारही धामांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याची तयारी आहे. यमुनोत्री आणि गंगोत्री धाममध्ये हेलिपॅड तयार झाले आहेत, तर बद्रीनाथमध्ये आधीपासूनच हेलिपॅड आहे. तीनही नवीन हेलिपॅडचे सर्वेक्षण आणि सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे. उत्तराखंडमध्ये केदारनाथ धामसाठी आधीच हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध होती. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती आणि हेली शटल सेवा कंपन्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत याची माहिती देण्यात आली. याचा प्रस्ताव उत्तराखंड नागरी उड्डयन विकास प्राधिकरणाला (युकाडा) पाठला आहे, जो एक-दोन दिवसांत मंजूर होईल. यानंतर भाविक चारही धामांसाठी हेलिकॉप्टर सेवा बुक करू शकतील. सध्या केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टर सेवा बुकिंग ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सुरू होत आहे. केदारनाथ धामचे कपाट २ मे रोजी उघडतील. त्याच दिवशी गुप्तकाशी, सिरसी व फाटा येथून केदारनाथ धामसाठी हेली सेवा सुरू होईल. युकाडाने आयआरसीटीसीला यात्रा नोंदणीचा डेटा पाठवला आहे. यंदा भाडे सुमारे ५% वाढले आहे. संभाव्य भाडे सिरसीहून ६०६१ रु. फाटाहून ६०६३ रु.आणि गुप्तकाशीहून ८५३३ रु. प्रति प्रवासी असेल.