सामुदायिक जेवण:केवळ बाजरीपासून बनवलेले पदार्थ एकत्र खातात गावकरी; तेलंगण, आंध्र प्रदेशातील उपक्रमाला प्रतिसाद

आंध्र प्रदेशातील कल्लोपल्ली गावात संध्याकाळचे वातावरण काहीसे वेगळे असते. रात्रीचे ८ वाजले आहेत. गावातील पुरुष, महिला व मुले एका सार्वजनिक ठिकाणी एकत्र आले. सामुदायिक जेवणासाठी तयार होते. २० घरांमधील महिलांनी नवीन पदार्थ बनवले आहेत आणि हे नवीन पदार्थ केळीच्या पानांवर सर्वांना दिले जाते. खास गोष्ट म्हणजे ही डिश फक्त ‘बाजरी’ पासून बनवली जाते. सर्व पदार्थ चाखल्यानंतर प्रत्येकाचे मत एक-एक करून घेतले जाते आणि शेवटी एक पदार्थ विजेता म्हणून निवडला जातो. विजेत्याला १००० रुपयांचे बक्षीस दिले जाते. त्या दिवशी कल्लोपल्लीमध्ये बाजरीपासून केलेल्या गोड पेयाला एकमताने विजेता घोषित केले. बाजरीला प्रोत्साहन देण्यासाठी आंध्र व तेलंगणातील ६० गावांमध्ये असा प्रयोग गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. पोषण स्थिती सुधारतेय वासन संस्थेचे कार्यक्रम समन्वयक उत्थप्पा म्हणतात, लोकांना बाजरी लागवड करण्यास प्रोत्साहित केलेे, ज्यामुळे उत्पादन वाढले. परंतु लोक बाजरी खाण्यास कचरत होते. या प्रयोगामुळे लोक ते नियमितपणे खात आहेत.
प्रत्येक कुटुंबाला दिली जाते २५० ग्रॅम बाजरी
हैदराबाद येथील वासन या संस्थेने ३ महिन्यांपूर्वी पोषण वनिता या नावाने ही मोहीम सुरू केली. याअंतर्गत दर दहा दिवसांनी प्रत्येक गावातील २० कुटुंबांना २५० ग्रॅम बाजरी, इडली रवा, रागी, ज्वारी, कांगणी, कोडो, कुटकी इत्यादी धान्ये दिली जातात. मग गावकरी त्याची स्वयंपाक पद्धत एकमेकांना सांगतात.