हरियाणात काँग्रेस आणि भाजपमध्ये स्पर्धा:अँटी- इन्कम्बन्सी, बंडखोरांचे मोठे आव्हान, मोठ्या पक्षांची समीकरणे बंडखोरांनी बिघडवली

हरियाणातील पक्ष उमेदवारांच्या माध्यमातून राजकीय समीकरणे दुरुस्तीचा प्रयत्न करत आहेत, मात्र अँटी-इन्कम्बन्सी आणि बंडखोरी हे मोठे आव्हान आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पक्ष उमेदवार निवड प्रक्रियेत व्यग्र आहेत. बंडखोर समीकरणे बिघडवण्याचा प्रयत्न करत असून भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी आहे. ३० जागांवर बंडखोरांनी अडचणीत आणले आहे. सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने ९० पैकी ८७ उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने चार मंत्र्यांसह १४ आमदारांची तिकिटे कापली आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसने सुरक्षित मार्ग स्वीकारला आहे, त्यामुळेच सर्व २८ आमदारांना तिकीट दिले आहे. जजपामधून भाजपमध्ये आलेल्या ३ आमदारांनाही तिकीट दिले आहे, पक्षाने १० पक्षांतर करणाऱ्यांना तिकीट दिले आहे. आप आणि काँग्रेस युतीची वाट पाहत असताना यादी जाहीर करू शकले नाहीत. दोन्ही पक्षांनी अनुक्रमे ६१ आणि ४१ उमेदवार जाहीर केले आहेत. आघाड्या किती मजबूत : केवळ प्रादेशिक पक्षांच्याच आघाड्या विधानसभेसाठी इनेलो-बसपा आणि जेजेपी-सपा यांची युती आहे. इनेलो जाट आणि बसपा दलित मतांवर अवलंबून. साडेचार वर्षे जेजेपीसोबत युती करणारा भाजपही एकटाच निवडणूक लढवणार असला तरी गोपाल कांडा यांच्या हलोपाशी युती होणार असल्याची चर्चा आहे. गोपाल कांडा यांच्यासाठी पक्ष एक जागा सोडू शकतो. मुद्दे : काँग्रेस शेतकरी-बेरोजगारी, भाजप योजनेवर विसंबून २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, जेजेपी आणि इनेलो यांनी धानाच्या दराचा मुद्दा उपस्थित केला. जाट आंदोलन, गुरमीतसिंग, राम रहीम आणि रामपाल यांच्या अटकेदरम्यान हिंसाचार असाही मुद्दा होता. इतर राज्यांमध्ये सरकारी नोकऱ्या देणे, बेरोजगारी, महागाई हेही मुद्दे होते. २०२४ मध्ये शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजना, बेरोजगारी, महागाई, ऑनलाइन पोर्टल्स मोठे मुद्दे. २०१९ मध्ये भाजपने कोणत्याही खर्चाशिवाय नोकऱ्या, भ्रष्टाचार थांबवणे, विकासातील प्रादेशिकता आणि राजकीय घराणेशाही दूर करणे मुद्दे मांडले. २०२४ मध्ये कोणत्याही खर्चाशिवाय नोकऱ्या, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींमध्ये १०% आरक्षण, एससी प्रवर्गातील वंचितांना आरक्षण, प्रादेशिकता, परिवारवाद, काँग्रेसच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराचे पाढे वाचत आहे. अपक्षांचे महत्त्व अबाधित राहील, २०१९ मध्येही ७ अपक्ष आमदार विजयी हरियाणाच्या राजकारणात अपक्षांचा नेहमीच प्रभाव आहे. १९६८ ते २०१९ पर्यंत, विजयांची संख्या पाच ते १६ पर्यंत आहे. १९८२ मध्ये १६ अपक्ष आमदार निवडून आले. १९७२ आणि २००० मध्ये ११-११ अपक्ष आमदार विजयी. १९९६ आणि २००५ मध्ये १०-१० अपक्ष आमदार विजयी. २०१९ च्या मागील निवडणुकीतही सात अपक्ष आमदार विजयी. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ पर्यंत वाढ भ्रष्टाचाराशी संबंधित दारू धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात त्यांना हजर करण्यात आले. याच प्रकरणात न्यायालयाने आरोपी आणि आपचे आमदार दुर्गेश पाठक यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सुधांशू त्रिवेदी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून नामनिर्देशित भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांचे प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून नामांकन करण्यात आले आहे. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी त्रिवेदी यांना प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केले. सुधांशू हे भाजपचे ज्येष्ठ राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. काँग्रेसने लोकसभेच्या निम्म्या जागा भाजपकडून हिसकावल्या हरियाणामध्ये विधानसभेच्या ९० जागा.२०१९ च्या निवडणुकीत भाजपला ४० (३६.४९% मते), काँग्रेस ३१ (२९.०८% मते), जननायक जनता पार्टी (जजपा) १० (१४.९% मते), इनेलोचा १ (२.४४ % मते), हरियाणा लोकहित पार्टी १ (०.६६% मते) आणि ७ अपक्ष (९.१७% मते) आमदार झाले. लोकसभेच्या १० जागा. २०१९ मध्ये सर्व जागा भाजपने जिंकल्या. २०२४ मध्ये भाजपच्या जागा निम्म्या म्हणजे ५ (४६.३% मते) पर्यंत कमी. काँग्रेसला ५ जागा (४३.८% मते)२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा जागांवर आघाडीबद्दल बोलायचे झाले तर भाजप ४४, काँग्रेस ४२ आणि आम आदमी पार्टी ४ सर्कलमध्ये पुढे होती. भाजपने हलोपाला पाठिंबा दिला. अशा स्थितीत जेजेपीच्या १०, इनेलोच्या १ आणि अपक्षांच्या ७ जागांपैकी ४ जागा भाजपच्या खात्यात, ११ काँग्रेसच्या खात्यात आणि ४ आपच्या खात्यात गेल्या. जर्मनीतील ड्रेस्डेन शहरात कॅरोला ब्रिजचा काही भाग तुटून नदीत पडला. या अपघातानंतर ड्रेस्डेनमधील वाहतूक, ट्राम सेवा आणि गरम पाण्याच्या पाइपलाइनवर परिणाम झाला. जीवितहानी झालेली नाही. अधिकाऱ्यांनी वाहनचालक आणि मालवाहू जहाजांना या क्षेत्रापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment