संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख सत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन:बेळगावात झाले अंत्यसंस्कार; ‘राष्ट्रवीर’कार पुरस्काराने सन्मानित

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख सत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन:बेळगावात झाले अंत्यसंस्कार; ‘राष्ट्रवीर’कार पुरस्काराने सन्मानित

ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, सिमालढ्यातील प्रमुख सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे सोमवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांचे वय 97 वर्षे होते. सिमालढ्याच्या चालता बोलता इतिहास व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा कामगार नेता अशी त्यांची ओळख होती. अप्पा म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात प्रा. आनंद मेणसे, ॲड. संजय मेणसे, कन्या सौ. लता पावशे, नीता पाटील व नातवंडे असा मोठा परिवार आहे. गेले काही दिवस ते आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री आठ वाजता त्यांच्यावर बेळगाव येथील सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कॉम्रेड कृष्णा मेणसे हे कट्टर कम्युनिस्टवादी, उत्तम वक्ते, सीमा सत्याग्रही, लेखक व संपादक म्हणून प्रसिद्ध होते. बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा या कारणासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. आपल्या विचारांशी प्रामाणिक असलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांना महत्त्वाची भूमिका दिली गेली होती आणि त्यांनी ती जबाबदारी उत्कृष्टपणे पार पडली. शालेय विद्यार्थीदशेत गांधीजींना भेटण्यासाठी ते घरात न सांगताच गेले होते. गांधीजींसशी संवाद साधल्यावर गांधीजींनी त्यांना परत आपल्या गावी म्हणजे बेळगावला जाण्याची व्यवस्था करून दिली होती. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी कृष्णा मेणसे यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. श्रमिक, कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांच्या न्याय हककसाठी त्यांनी संघर्ष केला. काही दिवसांपूर्वीच त्यांना ‘राष्ट्रवीर’कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे कर्नाटक, महाराष्ट्र आणि अन्य राज्यांतील विविध पक्षांच्या नेत्यांशी मजबूत मित्रत्वाचे संबंध होते. त्यांनी बसवेश्र्वरांच्या वचनांचा मराठीत अनुवाद केला होता. “गोठलेली धरती, पेटलेली मने” हे त्यांचे प्रवासवर्णन विशेषतः प्रसिद्ध आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून, काहींना पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. तसेच, ते “साम्यवादी” या साप्ताहिकाचे संस्थापक होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment