देवेंद्र फडणवीस यांना हरवण्यासाठी प्रचारात कॉंग्रेसकडून चौपट खर्च:गिरीश पंडाव खर्चात आघाडीवर, नागपूरमधील उमेदवारांनी किती ओतला पैसा?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सभांना सुरुवात केली आहे. तसेच या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसा देखील खर्च केला जात असल्याचे दिसत आहे. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने फडणवीसांच्या तुलनेत चार पट खर्च केला असल्याचे समोर आले आहे. प्रफुल्ल गुडधे यांचे चार पटीपेक्षा जास्त खर्च नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी प्रचारासाठी आत्तापर्यंत 2 लाख 99 हजार 581 रुपये खर्च केले असल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारासाठी 64 हजार 136 रुपये खर्च करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत प्रफुल्ल गुडधे यांचे चार पटीपेक्षा जास्त खर्च असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कॉंग्रेस व महाविकास आघाडीने जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसत आहे. गिरीश पांडव प्रचार खर्चाच्या बाबतीत आघाडीवर दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार गिरीश पांडव हे प्रचार खर्चाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. पांडव यांनी प्राचारावर आत्तापर्यंत 6 लाख 56 हजार 675 रुपये खर्च केले आहेत. उत्तर नागपूरमधील भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांनी 4 लाख 17 हजार 617, तर मध्य नागपूर येथील प्रवीण दटके यांनी 3 लाख 56 हजार 98 रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, नागपूर शहरातील सहा मतदारसंघातून सर्वात कमी करच नागपूरमधील कॉंग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी सर्वात कमी म्हणजे 44 हजार 243 रुपये खर्च केला आहे. मी काय पाकिस्तानमधून आलेला उमेदवार आहे का? एकीकडे उमेदवार प्रचारासाठी खर्च करत असून दुसरीकडे मात्र राजकारणही तापत असल्याचे दिसत आहे. पश्चिम नागपूरमधून भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे हे निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांना बाहेरचा उमेदवार असल्याचे म्हणत कॉंग्रेसकडून टीका होत आहे. यावर, मी काय पाकिस्तानमधून आलेला उमेदवार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच पश्चिम नागपूरमधील विद्यमान आमदार आणि कॉंग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे देखील दक्षिण नागपूरमध्ये राहतात आणि पश्चिम नागपूरमध्ये निवडणूक लढवतात, असे असताना मला बाहेरचे उमेदवार कसे म्हणू शकता? असा सवालही सुधाकर कोहळे यांनी विचारला आहे.