कॉरिडॉर बैठकीत विरोध अन् समर्थनही‎:पंढरीतील कॉरिडॉरसंबंधीच्या संवाद बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी दिली ग्वाही‎

कॉरिडॉर बैठकीत विरोध अन् समर्थनही‎:पंढरीतील कॉरिडॉरसंबंधीच्या संवाद बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी दिली ग्वाही‎

पंढरपूर शहराच्या विकासासाठी सरकारने कॉरिडॉर राबवण्याचा विचार पक्का केला आहे. मात्र यासाठी पंढरपूर येथील नागरिकांची मते आजमावणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. त्यासाठी आपण ही बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे शासन दरबारी नेमकी माझी भूमिका काय असावी, ही दाखवण्याची वेळ आल्यास आपण चुकीच्या पद्धतीने होणारे काम व कोणावर अन्याय होत असेल तर मी आमदार म्हणून नागरिकांच्या पाठीशीच उभा राहीन, असे आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी दिले आहे. पंढरपूर येथील कॉरिडॉरबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी शासकीय विश्राम येथे गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला पंढरपूर शहर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील रहिवासी, नागरिक आणि व्यापाऱ्यांना निमंत्रित केले होते. या बैठकीत आमदार समाधान आवताडे म्हणाले, पंढरपूरकरांचा कॉरिडॉरला विरोध आहे, असे माध्यमांनी म्हणू नये. केवळ काही भागातील नुकसान होत असल्याने त्या भागाचा योग्य विचार करू. मात्र याचा सर्व अर्थ येथील कॉरिडॉर प्रकल्पालाच पूर्णतः विरोध असल्याचे भासवू नये. त्यातून गैरसमज निर्माण होईल. आमदार समाधान आवताडे म्हणाले, कॉरिडॉरबाबत प्रशासनाकडून अजून कोणताही आराखडा आलेला नाही. परंतु सभागृहात जर हा विषय चर्चेला आला तर लोकांचे मत काय आहे? हे लोकप्रतिनिधी म्हणून मला माहीत असावे, यासाठी ही बैठक घेतली. जे इथल्या लोकांचे मत आहे, तेच माझे मत आहे. परंतु कॉरिडॉरला विरोध आहे, असा याचा अर्थ नाही. तर ते करताना कोणालाही त्रास होऊ नये. गेल्या काही वर्षांपासून पंढरपूर कॉरिडॉर विषय चर्चेत असून, मंदिर परिसरातील बाधित लोकांनी विरोध दर्शवला होता. तर काहीजण कॉरिडॉरचे समर्थनही करत आहेत. यावर या बैठकीत चर्चा झाली. नागरिक, व्यापाऱ्यांनी आपापली मते नोंदवली. नागरिक, व्यापाऱ्यांची बैठकीत मते

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment