दादा पोटात घ्या, असे मला फोन येतात:अरे काय पोटात घ्या, पोट फुटायला लागलंय; अजित पवारांनी व्यक्त केला संताप

दादा पोटात घ्या, असे मला फोन येतात:अरे काय पोटात घ्या, पोट फुटायला लागलंय; अजित पवारांनी व्यक्त केला संताप

बारामती येथे दिव्यांगांना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थित होती. यावेळी बोलताना अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. मला काही लोकांचा फोन येतो की, दादा पोटात घ्या, पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या? पोट फुटायला लागलंय. ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही, असं सांगायला. सगळ्यांना नियम सारखाच आहे, असे अजित पवार म्हणाले. आपली मुले काय करत आहेत? हे लक्ष ठेवणे पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पालकांनी पार पाडावी, असेही अजित पवार म्हणाले. दिव्यांगांना सहानभूती नको, समान संधी पाहिजे दिव्यांगांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. मी काय कायम तुमच्यासोबत नाही. काळाच्या पुढे काही करता येत नाही. पण, काम करताना नीट करतो. त्यामुळे पुढची लोक म्हणतील, चांगले काम केले. बजेटमध्ये डीपीडीसीला 22 हजार कोटी दिले. त्यातला एक टक्का दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा तरतूद केली आहे. दिव्यांगांना सहानभूती नको तर समान संधी पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. मी काय कायम तुमच्यासोबत नाही बारामतीत मी आतापर्यंत जेवढे काम केले तेवढे काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. 1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले, त्यांनी काय कामे केले ते पाहा आणि मी केलेले काम पाहा. मी अजूनही काम करणार आहे. मी काय कायम तुमच्यासोबत नाही. काळाच्या पुढे काही करता येत नाही. पण, काम करताना नीट करतो, असेही अजित पवारांनी म्हटले. … तर मी मकोका लावेन, अजितदादांचा इशारा बारामतीत विकास कामे करतो आहे. पण काही जण वेडे वाकडेपणा करतात. एक जण तर फुटपाथवर गाडी लाऊन गप्पा मारत होते. पोलिसांना गाडी जप्त करायला सांगितली आहे. परवा माझ्याकडे एक क्लिप आली. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले. त्याच्यामध्ये दोन मोटारसायकलवरून चार मुले आली. त्यांनी एकाला बेदम मारहाण केली. कुत्र्याला जसे मारत असतील तसेच मारले. मी पोलिसांना सांगितले कोणीही असो, अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता किंवा त्याच्या मुलाने असे केले, तरी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. मी हे असले अजिबात खपवून घेणार नाही. हे जर पुढे असेच चालत राहिले तर मी मकोका लावेन, असा इशाराही अजित पवारांनी दिला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment