‘दगडूशेठ’च्या दर्शनाला ‘मंगलमुखी’ तृतीयपंथी:अलंकारांनी सजून पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी केली श्रीं ची आरती

‘दगडूशेठ’च्या दर्शनाला ‘मंगलमुखी’ तृतीयपंथी:अलंकारांनी सजून पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी केली श्रीं ची आरती

सामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणेच समाजातील महत्त्वाचा मात्र बाजूला असलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ जशी सामान्य भक्ताला असते, तशी या तृतीयपंथींच्या मनातील बाप्पाच्या भेटीची ओढ दगडूशेठ गणपतीसमोर पहायला मिळाली. विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी दगडूशेठ गणपतीचे मनोभावे दर्शन घेत आरतीही केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे १३२ व्या वर्षी आयोजित गणेशोत्सवात गणेश पेठेतील मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट मधील तृतीयपंथीयांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे यंदाही किन्नर परिवार दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आला आहे. भारतामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न मोठा आहे. त्यामुळे याकरिता आम्ही बाप्पा चरणी प्रार्थना केली आहे की बाप्पाने त्यांना संरक्षण कवच द्यावे. दरवर्षी आम्हाला आरतीचा मान मिळतो आहे, तो दरवर्षी मिळत रहावा, अशी इच्छा किन्नर परिवारातर्फे व्यक्त करण्यात आली. केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपात केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन करण्यात आले. चेंदा हे कर्नाटकातील तुलुनाडू आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. दरवर्षी या वाद्य वादनाने गणरायाला अभिवादन केले जाते. चेंदा हे केरळ राज्यात उगम पावणारे एक दंडगोलाकार पर्क्यूशन वाद्य आहे. तुळुनाडू (कोस्टल कर्नाटक) मध्ये हे चेंडे म्हणून ओळखले जाते. केरळ आणि तुळुनाडूमध्ये हे सांस्कृतिक घटक म्हणून देखील परिचित आहे. हे वाद्य केरळमध्ये ३०० वर्षांहून अधिक काळ सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणून ओळखले जाते.

​सामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणेच समाजातील महत्त्वाचा मात्र बाजूला असलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ जशी सामान्य भक्ताला असते, तशी या तृतीयपंथींच्या मनातील बाप्पाच्या भेटीची ओढ दगडूशेठ गणपतीसमोर पहायला मिळाली. विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी दगडूशेठ गणपतीचे मनोभावे दर्शन घेत आरतीही केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे १३२ व्या वर्षी आयोजित गणेशोत्सवात गणेश पेठेतील मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट मधील तृतीयपंथीयांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे यंदाही किन्नर परिवार दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आला आहे. भारतामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न मोठा आहे. त्यामुळे याकरिता आम्ही बाप्पा चरणी प्रार्थना केली आहे की बाप्पाने त्यांना संरक्षण कवच द्यावे. दरवर्षी आम्हाला आरतीचा मान मिळतो आहे, तो दरवर्षी मिळत रहावा, अशी इच्छा किन्नर परिवारातर्फे व्यक्त करण्यात आली. केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपात केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन करण्यात आले. चेंदा हे कर्नाटकातील तुलुनाडू आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. दरवर्षी या वाद्य वादनाने गणरायाला अभिवादन केले जाते. चेंदा हे केरळ राज्यात उगम पावणारे एक दंडगोलाकार पर्क्यूशन वाद्य आहे. तुळुनाडू (कोस्टल कर्नाटक) मध्ये हे चेंडे म्हणून ओळखले जाते. केरळ आणि तुळुनाडूमध्ये हे सांस्कृतिक घटक म्हणून देखील परिचित आहे. हे वाद्य केरळमध्ये ३०० वर्षांहून अधिक काळ सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणून ओळखले जाते.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment