दापोलीत पुतण्या काकाच्या विरोधात:रामदास कदमांच्या विरोधात अनिकेत कदम निवडणुकीच्या रिंगणात

दापोलीत पुतण्या काकाच्या विरोधात:रामदास कदमांच्या विरोधात अनिकेत कदम निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे आता काका पुतणे यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. अनिकेत कदम म्हणाले, गेल्या तीन वर्षात आमच्यावर इन्कम टॅक्सची धाड, ईडीची धाड पडली. साई रिसॉर्ट प्रकरण कौटुंबिक वादातून झाले आहे. आम्ही खूप सहन केले आहे. जिल्हाध्यक्ष संजय कदम यांना आता निवडून आणायचा निर्धार आम्ही केला आहे. आमच्यासाठी ते ठामपणे उभे राहिले, आता आमचे कर्तव्य आहे त्यांना निवडून आणायचे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर बोलताना अनिकेत कदम म्हणाले, ते माझे मोठे काका आहेत. त्यांचा मला आदर आहे. पण प्रत्येकाची विचार मांडायची भूमिका वेगळी असते. त्या हिशोबाने आम्ही काम करणार. राजकारणात सक्रिय होण्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मी एक व्यावसायिक आहे. मला चांगली माणसं आपल्या क्षेत्रात हवी असतात. आता या क्षेत्रात राजकारण झाले आहे. प्रत्येकाची एक सुरुवात असते. जशी योगेशदादाची पण सुरुवात होती तशी आज माझी राजकारणात सुरुवात आहे. आमदार तालुक्याचा प्रमुख असतो त्या हिशोबाने तालुक्यात चांगली कामे झाली पाहिजेत या दृष्टीने आम्ही विचार करू. रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम दापोली मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी त्यांचा सख्खा चुलत भाऊ अनिकेत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. उद्योजक सदानंद कदम यांचे पुत्र अनिकेत कदम यांनी ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अनिकेत कदम यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. महाराष्ट्रातील राजकारणात आता हा चौथा काका पुतण्या संघर्ष असणार आहे. यापूर्वी मुंडे काका-पुतण्या, ठाकरे काका-पुतण्या, पवार काका-पुतण्या असे संघर्ष महाराष्ट्राने पहिले आहेत. त्यात आता कदम काका-पुतण्या संघर्ष आगामी विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे.

​शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे आता काका पुतणे यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. अनिकेत कदम म्हणाले, गेल्या तीन वर्षात आमच्यावर इन्कम टॅक्सची धाड, ईडीची धाड पडली. साई रिसॉर्ट प्रकरण कौटुंबिक वादातून झाले आहे. आम्ही खूप सहन केले आहे. जिल्हाध्यक्ष संजय कदम यांना आता निवडून आणायचा निर्धार आम्ही केला आहे. आमच्यासाठी ते ठामपणे उभे राहिले, आता आमचे कर्तव्य आहे त्यांना निवडून आणायचे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर बोलताना अनिकेत कदम म्हणाले, ते माझे मोठे काका आहेत. त्यांचा मला आदर आहे. पण प्रत्येकाची विचार मांडायची भूमिका वेगळी असते. त्या हिशोबाने आम्ही काम करणार. राजकारणात सक्रिय होण्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मी एक व्यावसायिक आहे. मला चांगली माणसं आपल्या क्षेत्रात हवी असतात. आता या क्षेत्रात राजकारण झाले आहे. प्रत्येकाची एक सुरुवात असते. जशी योगेशदादाची पण सुरुवात होती तशी आज माझी राजकारणात सुरुवात आहे. आमदार तालुक्याचा प्रमुख असतो त्या हिशोबाने तालुक्यात चांगली कामे झाली पाहिजेत या दृष्टीने आम्ही विचार करू. रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम दापोली मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी त्यांचा सख्खा चुलत भाऊ अनिकेत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. उद्योजक सदानंद कदम यांचे पुत्र अनिकेत कदम यांनी ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अनिकेत कदम यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. महाराष्ट्रातील राजकारणात आता हा चौथा काका पुतण्या संघर्ष असणार आहे. यापूर्वी मुंडे काका-पुतण्या, ठाकरे काका-पुतण्या, पवार काका-पुतण्या असे संघर्ष महाराष्ट्राने पहिले आहेत. त्यात आता कदम काका-पुतण्या संघर्ष आगामी विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment