आपल्या चौकात आपली अवकात वाढवायची:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, महादेव जानकरांची घोषणा

आपल्या चौकात आपली अवकात वाढवायची:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, महादेव जानकरांची घोषणा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केली आहे. मोठ्या पक्षांना आमच्यासारख्या छोट्या पक्षांची गरज नसते. आपल्या चौकात आपली अवकात वाढवायची ते माझ्या बुद्धीला पटते म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष बुथप्रमुखापासून वॉर्ड प्रमुखापर्यंत तालुकाध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष, राज्य आणि केंद्रीय पातळीवर आम्ही टार्गेट ठेवले आहे, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे. महादेव जानकर म्हणाले, भाजप सोबत आम्ही गेलो म्हणून आम्ही चहोते होतो म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना काय त्यांचे मोठे पक्ष काय करतात. मोठे होत गेले की छोट्या पक्षांची त्यांना गरज नसते. आता त्यांना मोठे प्लेयर भेटले आहेत. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, त्यामुळे आमच्यासारख्या छोट्यांची गरज नसते. आता या वर्षात आम्ही महाराष्ट्रात 57 लाख मेंबरशिप राष्ट्रीय पक्षाची उभी करणार आहोत, असे महादेव जानकर यांनी सांगितले आहे. महादेव जानकर पुढे म्हणाले, मी विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सोबत नव्हतो. राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढणार. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होती. माझी त्यांची युती नव्हती. मी तिसऱ्या आघाडीसोबत नव्हतो आणि महाविकास आघाडीसोबत देखील नव्हतो. मी 97 जागा स्वतंत्र लढवल्या. त्यातली एक जागा आम्ही विजयी झालो. आम्ही महायुतीतून विधानसभेलाच बाहेर पडलो. लोकसभेला आम्ही महायुतीत होतो. आता आम्ही त्यांच्या युतीत नाही, असे जानकर यांनी स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले, आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र मुंबई महापालिका निवडणूक लढणार आहोत. आम्ही सर्व महापालिका निवडणूक लढवणार आहोत. आम्ही तीन दिवसांपूर्वी दिल्लीत देखील उमेदवार दिले. बिहारची निवडणूक देखील आम्ही लढवत आहोत. आमचा पक्ष स्वतंत्र एकटा चलो चालला आहे, असे म्हणत त्यांनी बिहारची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. महाविकास आघाडीत फूट पडली तर फार चांगले होईल, असे महादेव जानकर म्हणाले. प्रत्येक पक्षाने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतंत्र लढले पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता कोणाच्या बाजूने आहे ते देखील समजेल. खासदार संजय राऊत जर तसे बोलत असतील तर त्यांचे वेलकम आहे. काँग्रेसने, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी वेगळे लढावे. ही फार चांगली गोष्ट आहे. आम्ही सध्या कुणाच्या आघाडीत नाही आणि युतीत देखील नाही. आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे महादेव जानकर म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment