दिल्ली सरकार महिलांना दरमहा 1000 रुपये देणार:महिला सन्मान योजना आजपासून लागू; केजरीवालांची घोषणा- निवडणुकीनंतर 2100 रुपये देणार
दिल्ली सरकार महिलांना दरमहा एक हजार रुपये देणार आहे. त्याला महिला सन्मान योजना असे नाव देण्यात आले आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली प्रत्येक महिला या योजनेच्या कक्षेत येईल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी या योजनेची घोषणा केली. आजपासून या योजनेसाठी नोंदणी सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर महिलांना दरमहा देण्यात येणारी रक्कम 2100 रुपये करण्यात येईल, असेही केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांनी 10 डिसेंबर रोजी ऑटो चालकांसाठी 4 घोषणा केल्या होत्या. 1. ऑटो चालकाच्या मुलीच्या लग्नासाठी 1 लाख रुपये दिले जातील. 2. होळी आणि दिवाळीला गणवेश घेण्यासाठी अडीच हजार रुपये दिले जातील. 3. 10 लाख रुपयांचा जीवन विमा आणि 5 लाख रुपयांचा अपघाती विमा प्रदान केला जाईल. 4. ऑटो चालकांच्या मुलांच्या प्रशिक्षणासाठी पैसे दिले जातील. दिल्लीत ‘आप’ एकट्याने विधानसभा निवडणूक लढवणार