पुणे पुस्तक महोत्सव मध्ये दहा हजार पुस्तकांते प्रदर्शन:सरस्वती चित्र निर्माण करत विश्वविक्रम होणारं – राजेश पांडे

नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया आणि फर्ग्युसन कॉलेज यांच्या सहकार्याने यंदाच्या वर्षी पुणे पुस्तक महोत्सव १४-२२ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.६०० हून अधिक दालने, १०० साहित्यिक सत्रे, पुस्तक प्रकाशने आणि चर्चासत्रे, मान्यवरांच्या चर्चा. मुलांसाठी दररोज ५० हुन अधिक उपक्रम आणि नामवंत व्यक्तीच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदा दोन महिने तयारी करून सरस्वती आकर मध्ये दहा हजार पुस्तकं माध्यमातून साकारत विश्वविक्रम करण्यात येणार आहे अशी माहिती विश्वस्त राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, प्रा .आनंद कटिकर उपस्थित होते. मलिक म्हणाले, यावर्षीही पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवात ‘पुणे लिट फेस्ट पुणे साहित्यिक महोत्सवाने होणार आहे. फर्ग्युसन कॉलेजमधील वाडिया सभागृहात जी २०-२२ डिसेंबर २०२४ रोजी हा कार्यक्रम होईल. लिट फेस्टमध्ये लेखक शिव खेड़ा, उ‌द्योगपती आणि राज्यसभेचे सदस्य गोविंद ढोलकिया, लेखक आणि पटकथा लेखक अक्षत गुप्ता, लेखक आणि पत्रकार वैभव पुरंदरे आणि निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांसारख्या दिग्गज वक्त्यांचा समावेश असेल.या साहित्यिक सत्राखेरीज पुणे पुस्तक महोत्सवात ‘चिल्ड्रन्स कॉर्नर बालविभागात’ छोट्‌या वाचकांसाठीही अनेक उपक्रम आहेत. चित्रकलेची स्पर्धा, घोषणा लेखन स्पर्धा यापासून ते मातीकाम, नाट्यकलेच्या कार्यशाळा यासारख्या विविध प्रकारच्या कार्यशाळा आणि उपक्रम खास मुलांसाठी म्हणून आयोजित केलेले आहेत. ही सत्रे पूजा उपगंळवार (नाट्य प्रशिक्षक आणि कथाकथनकार), विद्या नेसरिकर (लेखक आणि कथाकथनकार), राजीव तांबे (मुलांचे लेखक) आणि माधुरी पुरंदरे (लेखक आणि कलाकार) यासारखी मंडळी घेणार आहेत. यावर्षीच्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या कार्यक्रमात ‘ट्रेनिंग द ट्रेनर्स प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ हा नवा विभाग सुरू केलेला आहे. शिक्षक आणि प्रशिक्षकांना त्यांच्या रोजच्या आव्हानांवर माल करण्यासाठी योग्य कौशल्ये शिकवणे, मुलांना उत्तम प्रकारे गुंतवून ठेवण्यासाठी त्यांचे कथाकथन कौशल्य विकसित करणे हा या विभागाचा मुख्य उ‌द्देश आहे.या महोत्सवात अभंग रीपोस्ट, युग्म, हरगुन कौर आणि साधी बैंड यांसारख्या इंडी बंड आणि कलाकारांसह कलाकार आणि सादरकल्यांची मांदियाळी असेल. गेल्या वर्षी या महोत्सवाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. विविध क्षेत्रातले लोक प्रदर्शन पाहायला आले आणि या महोत्सवात पालकांनी मुलांना पुस्तक वाचून दाखवण्याचा उपक्रमः सर्वांत मोठा शब्द आणि पुस्तके वापरून तयार केलेलं सर्वात मोठं वाक्यः आणि लोक मोठ्याने वाचन करतानाचा सर्वांत मोठा विडिओ अल्बम या चार उपक्रमांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस देखील मिळवले.

  

Share