देशाचा ‘शत्रू’:आभटिंडा-अमृतसर कॉरिडॉर बनला आयएसआयचा ‘हायब्रिड हब’,पंजाब-राजस्थानातून पाक गुप्तहेर पकडले

पाकची गुप्तचर संस्था आयएसआय भारतात हायब्रिड हेरगिरी नेटवर्क चालवत आहे. पंजाबमधून अटक केलेल्या पाक गुप्तहेर गगनदीप सिंगने हे उघड केले. तपास यंत्रणांशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, हे हायब्रिड नेटवर्क आयएसआयने पंजाबच्या भटिंडा-अमृतसर कॉरिडॉरमध्ये खलिस्तानी घटकांच्या मदतीने सक्रिय होते. शिवाय पाकचे गुप्तहेर नेटवर्क (जसे की ज्योती मल्होत्रा, गजाला) सोशल मीडिया, स्थानिक वाहतूक संघटना व डिजिटल पेमेंट सिस्टिमद्वारे ‘हायब्रिड गुप्तहेर मॉडेल’मध्ये बदलत आहे. गगनदीपच्या फोनवरून २० पाकिस्तानी नंबर व संवेदनशील संदेश सापडले आहेत. धोका : ट्रान्सपोर्ट युनियनमध्ये सहभागी होऊन गगन पाठवायचा लोकेशन गगनदीप हा पाकस्थित खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावलाशी जोडला होता, ज्याने त्याला आयएसआयमध्ये नेले. चावला हा लष्कराचा प्रमुख दहशतवादी हाफिज सईदशी जोडलेला आहे. गगनदीप पंजाबमधील एका ट्रान्सपोर्ट युनियनशीही संबधित आहे. तो लष्कराच्या ट्रकच्या हालचाली, युनिट वेळापत्रक, पुरवठा मार्ग याबद्दल माहिती मिळवत असे. नंतर तो हे पाकच्या तांत्रिक प्रक्रिया पथकाला पाठवत असे, ते एआय प्रणालीमध्ये फीड करत. गगनदीप नगर कीर्तन, मिरवणुकांचे फोटो काढून सैन्याच्या हालचालीच्या नावाखाली ते पाकिस्तानला पाठवत असे. त्याला २०२४ च्या बैसाखीदरम्यान ३ लष्करी तुकड्यांचे जीपीएस लोकेशन शेअर करण्यासाठी इनपुट मिळाले आहेत. यासाठी त्याला प्रत्येक इनपुटसाठी ५००० ते १५००० रुपये मिळाले. हे पैसे भारतातील एका बनावट खात्याच्या यूपीआय आयडीवरून ट्रान्सफर केले गेले. हे चॅनल हरियाणातील एका व्यावसायिकाचे असल्याचे तपास यंत्रणेला संशय आहे. पंजाब पोलिसांनी मंगळवारी तरणतारण येथून पाक गुप्तहेर गगनदीप सिंगला अटक केली. डीजीपी गौरव यादव म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान गगनदीप पाक गुप्तहेर संघटना आयएसआयच्या संपर्कात होता. त्याने भारतीय सैन्याच्या तैनाती व मोक्याच्या ठिकाणांची माहिती आयएसआयला दिली. राजस्थान पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली शकूर खानला अटक केली. तो जैसलमेर रोजगार कार्यालयात सहायक प्रशासकीय अधिकारी आहे. तो पाक उच्चायुक्तालयाशी संबंधित दानिशच्या माध्यमातून अनेक वेळा पाकला गेला.