देशाच्या ऐक्यात कोणतीही तडजोड नाही:देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता नसते; जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू – शरद पवार

पहलगाम येथे घडलेली घटना हा मोठा धक्का आहे. देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता नसते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे. देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असेही शरद पवारांनी ठणकावून सांगितले. ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भाष्य करत उपरोक्त विधान केले. यावेळी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत नेमके काय झाले याबाबतही माहिती दिली. नेमके काय म्हणाले शरद पवार? स्वातंत्र्य चळवळीच्या काळात समाजवादी लोक एकत्र आले होते आणि महाराष्ट्रात या विचारसरणीची मुळे खोलवर रुजली. पुणे जिल्ह्यात विशेषतः पुरंदर भागात समाजवादी लोकांचा प्रभाव अधिक राहिला आहे. या नेत्यांनी जाहिरातबाजी न करता, कुठल्याही अपेक्षा न ठेवता काम केले आहे, असे शरद पवार म्हणाले. पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, देश सध्या अडचणीतून जात आहे. पहलगाम येथे घडलेली घटना हा मोठा धक्का आहे. देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता नसते. आम्हाला विचारण्यात आले की, काय करावे, तेव्हा आम्ही सांगितले की, आज देश एक आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख शरद पवारांनी यावेळी केली. त्या बैठकीत काही कमतरता आमच्याकडून झाल्या, हे नेतृत्वाने मान्य केले. पण आज देश संकटात असताना त्या कमतरतांवर चर्चा करण्याची वेळ नाही, असे शरद पवार म्हणाले. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे. देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही, जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू, असेही शरद पवार यांनी ठणकावून सांगितले. शरद पवार एक विचार : रावसाहेब पवार तर रावसाहेब पवार म्हणाले की, शरद पवार एक विचार आहे. आजचे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे, ते देशासमोरील सगळ्यात मोठे आव्हान आहे. आज विचारहीन राजकारण सुरू असून लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल, संविधानात जिवंत ठेवायचे असेल, तर समाजवादाशिवाय पर्याय नाही, असे रावसाहेब पवार म्हणाले. दगडात परमेश्वर नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर ब्रिटिश परवडले. पण, या पुढचा काळ परवडणार नाही, असेही त्यांनी म्हटले. पहलगाम हल्ल्यातील मृतांना ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरवावे:कुटुंबातील एका सदस्याला शासकीच नोकरी द्यावी, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील भ्याड अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांच्या कुटुंबीयांनी हिंमतीने संपूर्ण प्रसंगाचा सामना केला. म्हणूनच त्यांना येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘नागरी शौर्य’ पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे. यासोबतच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मला खात्री आहे की ते या विनंतीचा नक्कीच विचार करून यावर सकारात्मक निर्णय जाहीर करतील, असा आशावादही सुळे यांनी यावेळी व्यक्त केला. पूर्ण बातमी वाचा…

  

Share