निर्धार मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातून शिंदे गटावर डागली तोफ:आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत- संजय राऊत

निर्धार मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातून शिंदे गटावर डागली तोफ:आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत- संजय राऊत

शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा नाशिक येथे पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या मेळाव्यात शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषण ऐकवण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आभासी भाषणातून शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. या मेळाव्यात राज्यभरातून शिवसेनेतील मान्यवर उपस्थित होते. नाशिक येथील या निर्धार मेळाव्याचे समारोप करताना संजय राऊत यांनी देखील आपले मत मांडले. मी उद्धव ठाकरे साहेबांना एवढेच सांगू इच्छितो नाशिकचे हे शिबिर फक्त नाशिकच्या शिवसैनिकांमुळे यशस्वी झाले आहे. आज आपल्याकडे सत्ता नाहीये, त्यामुळे असे कार्यकर्ते कसे होऊ शकतात असा प्रश्न पडतो. पण हीच खरी शिवसैनिकांची ताकद आहे. आज आपला इथे कार्यकर्म सुरू असताना त्यांनी बाहेर काय केले? दर्गा पाडण्याचे काम केले. शहरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण आपण हे शिबिर यशस्वी करून दाखवले आहे. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आजच्या शिबिराने आपण दाखवून दिले आहे की शिवसैनिक अजूनही खंबीर आहे. यापेक्षा वाईट काळ आपण पहिला आहे. जो सर्वात वाईट काळ बघतो तोच पुढे चांगले भविष्य बघू शकतो. छावा चित्रपटातून आपण छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष पहिला, तो संघर्ष आपल्या वाटेला आलेला आहे. संभाजी महाराजांकडे कवी भूषण होता. मन के जिते जीत है, मन के हारे हार, हार गये जो बिना लडे उनपर हें धिक्कार.. असे म्हणत संजय राऊत यांनी चित्रपटातील कवि कलश यांची कविता वाचून दाखवली. नाशिकचा पराभव का झाला, उद्धाव साहेब नाशिकच्या पराभवाचे विश्लेषण जर कोणी केले असेल तर ते वॉशिंग्टनला झाले. सिस्टर तुलसी असे पंतप्रधान मोदी यांना म्हणतात. या सिस्टर तुलसी गुप्तचर विभागामध्ये प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते आणि निकाल बदलले जाऊ शकतात. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी हे सांगितले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment