देवाभाऊ – दाढीभाऊ – जॅकेटभाऊ, तिघे मिळून ‘महाराष्ट्र खाऊ’:अमित शहा गृहमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाहीत -उद्धव ठाकरे
देवाभाऊ-दाढीभाऊ-जाकेटभाऊ हे तिघे मिळून ‘महाराष्ट्र खाऊ’ करत असल्याचा ओरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्याचसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत असल्याचे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्रातून निघताना मोदी आणि शहा यांच्या देखील बॅगा तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून जात असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील औसा येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासह मोदी – शहा यांच्यावर टीका केली. अमित शहा गृहमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्यास योग्य नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. मोदींच्या थापांमुळे महाराष्ट्र त्रस्त आहे. त्याच प्रमाणे माझी बॅग तपासण्यात अर्थ नाही, पण मोदी आणि शहा यांच्या बॅगा या तपासल्या पाहिजेत. महाराष्ट्रातून निघताना मोदी आणि शहा यांच्या बॅगा तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून निघाले असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. आज मला सोलापूरला जायचे होते, मात्र, हेलिकॉप्टरने येण्यापासून रोखले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत असल्याचा दावा त्यांनी केला. सोलापूरच्या सभेत मोदींनी महाराष्ट्राच्या हितासाठी बोलावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य नाहीत, त्यांनी 15 लाख देण्याचे सांगितले मात्र 1500 रुपयेच देत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. मंत्रालयात एक महत्वाची बैठक झाल्याची माहिती माझ्याकडे आली आहे. या बैठकीनंतर राज्यातील सोयाबून आणि कापूस उत्पादक शेतकरी कसा सुखी झाला आहे, याची जाहिरात काही वर्तमानपत्रात येऊ शकते. मात्र, राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी हा राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर चिडलेला आहे. मोठ्या प्रमाणात खरेदी झाली असल्याचा दावा ते करत असले तरी देखील शेतकऱ्यांकडे अजूनही त्यांचा माल पडून असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. काही दिवसात पेपर मध्ये तशा बातम्या देखील छापून येतील. मात्र या बातम्या छापून आल्यानंतर शेतकरीच बोलतील, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. या संदर्भातील खालीत बातमी देखील वाचा…. मोदींच्या बॅगांचीही तपासणी करा:बॅग तपासणीनंतर उद्धव ठाकरेंनी औसामध्ये काढला दुसरा व्हिडिओ; निवडणूक आयोगावर टीका विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभरातील नेत्यांच्या बॅगांची आणि गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी झाल्यानंतर राज्यभरात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडिओ काढत याबाबत निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा औसा येथे सभेसाठी जाताना उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. आजही उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ शूट करत निवडणूक आयोगावर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला. पूर्ण बातमी वाचा….