देवेंद्र फडणवीस सरकारचा आज अर्थसंकल्प:शेतकरी कर्जमाफीकडे राज्याचे लक्ष; अर्थमंत्री अजित पवारांचे 11 वे बजेट

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याची घोषणा या अर्थसंकल्पात होते का? लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची आश्वासन पूर्ती होते का? याकडेही सर्वांचे लक्ष आहे.