दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल:संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे म्हणाले, विरोधकांनी काही म्हंटले तर माझ्याकडून काही तरई जाणार, मग त्यात नक्कीच मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्यात अडचण होणार. त्यामुळे एकदा काय ते दूध का दूध पाणी का पाणी कळावे आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातून कळले आहे. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, मी सुरुवातीपासून सांगत आहे की ही व्यवहारातून झालेले भांडण आहे ज्यातून अतिशय निर्घुणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. अशा प्रकारे हत्या झाली आहे की त्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. त्यामुळे जवळजवळ सर्वच आरोपींना अटक झाली आहे. आणि जेवढी तीव्र भावना या प्रकरणात आमच्या सर्वांचीच होती आता जे अटक झाली आहेत त्यात एसआयटी नेमली आहे, सीआयडी नेमली आहे, त्यामुळे याचा शेवटपर्यंत याचा तपास होणार आहे. कोण होते, आदल्या दिवशी जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ आणि एक पोलिस अधिकारी हॉटेलमध्ये चहा पित असतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. धनंजय मुंडे म्हणाले, मकोका लावण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे, याच प्रकरणात लावायचा आहे की बीड जिल्ह्यात इतरही काही ठिकाणी जिथे गरज आहे त्याही ठिकाणी लागला पाहिजे, या विचाराचा मी आहे. पण आत्ता जे काही मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेल आहे त्यामुळे स्वाभाविक आहे की सर्वांचेच यात समाधान झाले आहे. या आरोपाशी माझे नाव जोडणे वगैरे या सदनात अनेकदा असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे शेवटी तपासणाऱ्याचा प्रश्न आहे. आता त्यांनी केस पण सीआयडीकडे दिली आहे. त्यामुळे मी म्हंटले ना तुम्हाला की दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. विरोधकांनी काय बोलावे हे मला सांगता येत नाही. पण त्यांनी हे जरी सांगितले की मी कराड अण्णा कुठे आहे तर पोलिसांनाही समजले असते आणि त्यांनाही अटक केली असती.