मधुमेह तपासणी किटसह रुग्णांना खोकल्याचीसुद्धा औषधी मिळेना:तिवसा उपजिल्हा रुग्णालयात बाहेरून आणावी लागते औषधी

मधुमेह तपासणी किटसह रुग्णांना खोकल्याचीसुद्धा औषधी मिळेना:तिवसा उपजिल्हा रुग्णालयात बाहेरून आणावी लागते औषधी

रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तिवसा उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक औषधांचा चांगलाच तुटवडा निर्माण झाला आहे. येथे मधुमेह तपासणी किट व कफ सिरफसह अन्य औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तिवसा तालुक्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांना येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स उपलब्ध होऊन वेळेत उपचार मिळावे, कोणत्याही रुग्णाची येथे औषधोपचाराविना गैरसोय होऊ नये म्हणून नव्याने सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रुग्णालयात तालुक्यातून मोठ्या संख्येने सर्दी, ताप, खोकल्यासह अन्य रुग्ण उपचारासाठी येत असले, तरीही ओपीडीची संख्या पाहता येथे रुग्णांना लागणारा औषधी साठा गेल्या काही दिवसांपासून अपुरा पडत आहे. त्यामुळे बाहेरून महागडे औषध आणावे लागण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. तालुक्यातील अनेक गावातून येथे रुग्णांना उपचारासाठी यावे लागते. मात्र, उपचारानंतर बाहेरील औषधी खरेदीसाठी पैसे मोजावे लागत आहे. हिवाळ्याची चाहूल लागत असून वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कफ सिरफ, फंगल इन्फेक्शन, ब्लड शुगर टेस्ट किट, अॅलर्जीची औषधी अशा काही महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांची औषधीविना गैरसोय होत आहे. परिणामी रुग्णांना औषधींची बाहेरून खरेदी करावी लागत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच औषधी उपलब्ध होईल ^रुग्णांच्या मागणीनुसार आम्ही जिल्हा पातळीवर कफ सिरफसह अन्य औषधींची डिमांड पाठवली. मात्र, ती रुग्णांची संख्या पाहता कमी पडत आहे. आता देखील आम्ही औषधींची मागणी केली आहे. लवकरच ती उपलब्ध होईल. -डॉ. शिवराज माने, वैद्यकीय अधीक्षक अधिकारी. औषध उपलब्ध नसल्याचे सांगतात कर्मचारी ^ मी व अन्य रुग्ण रुग्णालयात गेलो असता, येथे कफ सिरफ उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. ब्लड-शुगर टेस्ट किट सुद्धा येथे उपलब्ध नाही. एवढ्या मोठ्या रुग्णालयात रुग्णाच्या सुविधेसाठी अत्यावश्यक सर्व औषधी व अन्य सुविधा उपलब्ध असाव्यात. -गजानन रामटेके, रुग्ण, तिवसा.

​रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तिवसा उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक औषधांचा चांगलाच तुटवडा निर्माण झाला आहे. येथे मधुमेह तपासणी किट व कफ सिरफसह अन्य औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तिवसा तालुक्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांना येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स उपलब्ध होऊन वेळेत उपचार मिळावे, कोणत्याही रुग्णाची येथे औषधोपचाराविना गैरसोय होऊ नये म्हणून नव्याने सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रुग्णालयात तालुक्यातून मोठ्या संख्येने सर्दी, ताप, खोकल्यासह अन्य रुग्ण उपचारासाठी येत असले, तरीही ओपीडीची संख्या पाहता येथे रुग्णांना लागणारा औषधी साठा गेल्या काही दिवसांपासून अपुरा पडत आहे. त्यामुळे बाहेरून महागडे औषध आणावे लागण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. तालुक्यातील अनेक गावातून येथे रुग्णांना उपचारासाठी यावे लागते. मात्र, उपचारानंतर बाहेरील औषधी खरेदीसाठी पैसे मोजावे लागत आहे. हिवाळ्याची चाहूल लागत असून वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कफ सिरफ, फंगल इन्फेक्शन, ब्लड शुगर टेस्ट किट, अॅलर्जीची औषधी अशा काही महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांची औषधीविना गैरसोय होत आहे. परिणामी रुग्णांना औषधींची बाहेरून खरेदी करावी लागत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच औषधी उपलब्ध होईल ^रुग्णांच्या मागणीनुसार आम्ही जिल्हा पातळीवर कफ सिरफसह अन्य औषधींची डिमांड पाठवली. मात्र, ती रुग्णांची संख्या पाहता कमी पडत आहे. आता देखील आम्ही औषधींची मागणी केली आहे. लवकरच ती उपलब्ध होईल. -डॉ. शिवराज माने, वैद्यकीय अधीक्षक अधिकारी. औषध उपलब्ध नसल्याचे सांगतात कर्मचारी ^ मी व अन्य रुग्ण रुग्णालयात गेलो असता, येथे कफ सिरफ उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. ब्लड-शुगर टेस्ट किट सुद्धा येथे उपलब्ध नाही. एवढ्या मोठ्या रुग्णालयात रुग्णाच्या सुविधेसाठी अत्यावश्यक सर्व औषधी व अन्य सुविधा उपलब्ध असाव्यात. -गजानन रामटेके, रुग्ण, तिवसा.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment