मधुमेही बालकांचा विघ्नहर्ता:आई-बापाने दिला रॉकेलचा डब्बा, म्हणाले- मरून जा; ‘उडाण’ने दिले नवीन आयुष्य अन् जगण्याचे बळ!

मधुमेही बालकांचा विघ्नहर्ता:आई-बापाने दिला रॉकेलचा डब्बा, म्हणाले- मरून जा; ‘उडाण’ने दिले नवीन आयुष्य अन् जगण्याचे बळ!

10 वर्षांची ती चिमुकली द्विधा अवस्थेत होती. एकीकडे स्वतःच्या आई-बापानेच तिच्यासमोर रॉकेलचा डब्बा, काडीपेटी आणून ठेवली. तु समजदार आहेस काय करायचं ते तुला सांगायला नको. असं म्हणून ते निघून गेले. तर दुसरीकडे तिचे प्रेमळ उडाणचे कुटुंब होते, तिची स्वप्न होती, सुंदर आयुष्य जगण्याची महत्त्वकांक्षा होती. आत्महत्या करुन संपवून टाकावे का संगळे क्षणार्धात असा विचार मनात आला. जिथे सख्ख्या आई-बापालाच पोटची मुलगी नकोये तिथे समाजाकडून काय अपेक्षा करणार हा विचार तिच्या मनात आला. तिने डब्बा उचलला अंगावर ओतला. डोळ्यातले अश्रू सुद्धा त्यात एकत्र झाले. आता फक्त एका सेकंदाचा अवकाश आणि ती कायमची निघून जाणार होती. धगधगत्या ज्वाला तिला त्यांच्यात सामावून घेणार होत्या. पण अचानक तिच्या डोळ्यांसमोर आईपेक्षा जास्त जीव लावणाऱ्या डॉ. अर्चना सारडा यांचा प्रेमळ आणि हसरा चेहरा आला. आणि तिने मरण्याचा विचार सोडला. उडाणच्या अनामिकाची (नाव बदललेले आहे) ही कहानी… पुढे तिची संपूर्ण जबाबदारी संस्थेने घेतली. तिचे शिक्षण उडाणने केले. डीएड, बीएड होऊन ती शिक्षिका म्हणून स्वतःच्या पायांवर उभी राहिली. तिचे लग्नही झाले. आज तिला एक गोंडस मुलगी आहे. उडाणच्या मदतीने तिने एक व्यवसायही सुरु केलाय. आपल्या या नव्या आयुष्याचे श्रेय ती उडाण आणि डॉ. अर्चना सारडा यांना देते. अशा हजारो मुलांच आयुष्य उडाणने मार्गी लावलंय. त्यांना जगण्याला बळ आणि उद्देश दोन्ही दिलेत. उडाण आज मधुमेही बालक आणि पालक या दोहोंसाठी विघ्नहर्त्याच्या भूमिकेत आहे. एकदा बालक उडाणमध्ये आले की त्याचे सगळे सुख, दुःख, यश, अपयश या सगळ्यात संस्था कुटुंब, मित्राप्रमाणे त्यांच्या सोबत असते. हाच तो टर्निंग पॉईंट 2000 ची घटना. एक पालक आपल्या 8-9 वर्षांच्या मुलीला घेऊन डॉ. सारडा यांच्याकडे आले. दोघेही ग्रामीण भागातले. टाईप-1 मधुमेह असलेल्या या मुलीची परिस्थिती गंभीर होती. त्यांनी मुलीला मॅडमच्या टेबलावर टाकले आणि म्हणाले ही मुलगी वाचली तर आम्हाला सांगा नाहीतर तुम्हीच इकडे तिला अग्निडाग देऊन टाका. आम्ही आता थकलोय. आमची कुठल्याही गोष्टीची तयारीही नाही आणि आमची तशी परिस्थितीही नाही. डॉ. अर्चना यांनी या मुलीवर मोफत उपचार केले. तिच्या घरच्यांशी बोलल्यावर लक्षात आले की मुलीच्या जन्मापासून आजपर्यंत तिच्या उपचारांसाठी थोडेथोडे करुन त्यांची सर्व जमीन, घर गेले. मधुमेहाचे लवकर निदान झाले नाही. निदान झाल्यानंतरही ती दर 3 महिन्याला आजारी पडत असे. त्यांची सर्व जमापुंजी मुलीवर संपली. त्यामुळे शेवटी निराश झालेले ते आई-वडिल तिला डॉ. सारडांकडे घेऊन आले. आणि हाच तो टर्निंग पॉईंट होता जिथून संस्थेची सुरुवात झाली. साहसचे उडाण झाले 2000 पासून 2005 पर्यंत साहस या नावाने प्रकल्प सुरु होता. डॉ. सारडा दाम्प्त्याने मधुमेह असलेल्या बालकांना मदत करण्यास सुरुवात केली. आपल्या कमाईतला काही हिस्सा, कुटुंबीय, मित्र यांच्याकडून निधी घेऊन सुरुवातीला प्रकल्प सुरु होता. मात्र जसजसे काम वाढत गेले तसतशी निधीची आवश्यकता इतर सर्व गोष्टींचीही गरज वाढली. 2005 मध्ये संस्थेची नोंदणी करण्यात आली. आणि साहसचे नाव बदलून उडाण करण्यात आले. जन्मापासूनच शरीरात इन्सुलिनची निर्मिती न होणाऱ्या किंवा इन्सुलिन निर्मितीसंबंधित अनेक गंभीर प्रश्न असणाऱ्या प्रत्येक बालमधुमेहीला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावे लागते. एकीकडे इन्सुलिन, सिरींज, मधुमेह तपासणीसाठी ग्लुकोमीटर, त्याच्या पट्ट्या असा वारेमाप खर्च तर दुसरीकडे इन्सुलिन घेणे, मधुमेहाची तपासणी करणे आणि आहार याबाबत मार्गदर्शनाचा अभाव. त्यामुळे या आजाराबाबत अज्ञानच मोठ्या प्रमाणावर आहे. रक्तातली साखर तपासणी, इन्सुलिन कसे घ्यायचे या सर्व गोष्टी बालकांना उडाणमध्ये शिकवल्या जातात. उडाणची 7-8 वर्षांची मुलेही स्वतःचे स्वतः इन्सुलिन घेतात. स्वतःच्या हाताने इन्सुलिन टोचतात इन्सुलिन किती घ्यायचे याची मात्रा ही मुलांच्या शरीरातील मधुमेहाच्या पातळीवरून ठरवली जाते. त्यामुळे दिवसातून किमान तीन वेळा मधुमेहाची तपासणी करावी लागते. मूल दिवसातून चार वेळा खात असेल तर चार वेळा आणि झोपताना एकदा असे पाच वेळा इन्सुलिन घेणे गरजेचे असते. एकंदर आठ ते नऊ वेळा टोचून घ्यावे लागते. अगदी छोटी मुलेही स्वतःच्या हाताने इन्सुलिन टोचून घेतात. पालकांचे विशेष प्रशिक्षण टाईप-1 मधुमेहाबाबत जागरुकता नसल्यामुळे पालकांना आपल्या चिमुरड्या बालकाला मधुमेह झाला आहे हा धक्का पचवायला बराच वेळ लागतो. हा आजार आयुष्यभराचा असतो. यामुळेच पालक कोलमडून पडतात. अशा पालकांसाठी आज उडाण एक भक्कम आधार आहे. एकदा पालक मुलांना संस्थेत घेऊन आले की त्यानंतर त्यांचे अर्धे टेन्शन कमी होते. याठिकाणी सुरुवातीला बालकांच्या सर्व तपासण्या व्यवस्थितपणे केल्या जातात. त्यानंतर पालकांचे समुपदेशन केले जाते. यामध्ये त्यांचे सर्व अज्ञान दूर केले जाते. बालकाशी कसे वागावे, त्याला काय व कसे खाऊ घालावे अशा अनेक गोष्टी याठिकाणी पालकांना शिकवल्या जातात. पालकांचे विशेष प्रशिक्षण घेतले जाते. संस्थेत 1313 मुले संस्थेच्या सुरुवातीविषयी डॉ. संपत सारडा म्हणाले, 2000 साली आलेल्या एका मुलीचे मोफत उपचार केले. तिच्या कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीविषयी कळाले. आणि येथूनच या प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवातीला मुलेच नव्हती. त्यावेळी आमच्या लक्षात आले की ही मुले वाचतच नाही. साहस नावाने प्रकल्प सुरु झाला. पुढे याचे नाव उडाण झाले. सध्या आमच्या संस्थेत 1313 मुले आहेत. यात 625 मुली आणि 688 मुले आहेत. 24 तास हेल्पलाईन पालक, मुले यांना आजाराबाबत संपूर्ण माहिती ही विविध खेळ, चित्रे यांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने समजावली जाते. कोणतीही अडचण आली तर तत्परतने मार्गदर्शन करण्यासाठी उडाणमार्फत 24 तास हेल्पलाईन चालवली जाते. या हेल्पलाईनवर दिवसाला 100 ते 150 कॉल येत असल्याचे पुजा ताई सांगतात. इतकेच नव्हे तर उपचाराव्यतिरिक्त मुलांचा विकास, कौटुंबिक प्रश्न, किशोरअवस्थेतील अडचणी, लग्न, शिक्षण, नोकरी अशा विविध टप्प्यांवर उडाण मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळेच आज अनेक मुले विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये आमची मुले नाहीत, हे पुजाताई अभिमानाने सांगतात. डॉक्टर देवापेक्षा कमी नाही उडाणमध्ये उपस्थित पालकांशी संवाद साधला. यावेळी 9 वर्षीय कादंबरीच्या आई त्रिवेणी डोंगरे म्हणाल्या, डॉक्टर हे देवापेक्षा कमी नाही. याची प्रचिती मला उडाणमध्ये आल्यावर आली. आम्ही ग्रामीण भागातील आहोत. मी शेती करते. त्यामुळे एवढ्या कमी वयातही मधुमेह होऊ शकतो याबाबत आम्हाला काहीच माहित नव्हते. मात्र उडाणमध्ये आल्यावर आम्हाला खूप सहानुभूती आणि प्रेम मिळाले. जे आम्ही आयुष्यभर विसरु शकत नाही. माझ्या मुलीची खूप मोठी स्वप्न आहेत आज तिची स्वप्न उडाणमुळे साकार होतील. जळगावचे सौरभ पाटील म्हणाले, माझा मुलगा तनय 2 वर्षांचा असताना आम्हाला त्याला मधुमेह असल्याचे कळाले. सुरुवातीला आमच्यासमोर फक्त अंधार होता. पण नंतर आम्हाला उडाणची माहिती मिळाली. आम्ही याठिकाणी आलो. उडाणने आम्हाला सर्व प्रकारची मदत केली. याठिकाणी सर्व तपासण्या मोफत होतात. त्यांच्या हेल्पलाईनवर आम्ही कधीही कॉल करु शकतो. उडाणमुळेच स्वतःच्या पायावर उभा संस्थेत आज कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले कमलेश आणि मंजुषा स्वतः टाईप-1 मधुमेही आहेत. कमलेश चित्ते म्हणाला, मला 13 वर्षांपूर्वी टाईप-1 मधुमेह असल्याचे निदान झाले. त्यावेळी मी उडाणमध्ये आलो. आणि आज मी उडाणमुळेच स्वतःच्या पायावर उभा आहे. उडाणमुळेच मला जगण्याची आशा मिळाली. मंजुषा बर्वे म्हणाली, मला वयाच्या 12 व्या वर्षी टाईप-1 मधुमेह झाला. तेव्हापासून मी उडाणशी जोडले गेले. आणि आज मी याठिकाणीच काम करत असल्याने समाधान वाटते. अंधश्रद्धेमुळे 2 बालके गमावली टाईप-1 मधुमेहीच्या पालक आणि उडाण संस्थेतील पूजा दुसाद सांगतात, इन्सुलिन इंजेक्शन दररोज पाच वेळा घ्यायचे म्हणजे काही गंभीर आजार असल्याचा गैरसमज मोठ्या प्रमाणात समाजात आहे. विशेषत: ग्रामीण भागात अनेक पालक मधुमेह पूर्णपणे बरा होईल, इंजेक्शनची गरज नाही अशा भूलथापांना बळी पडून झाडपाला, आयुर्वेदिक, बाबा-फकीर अशा उपचारांच्या मागे धावतात. या अंधश्रद्धेमुळेच उडाणने आपली 2 बालके गमावल्याचे त्या सांगतात. टाईप-1 मधुमेह म्हणजे काय? टाईप-1 मधुमेह मधुमेह म्हणजे शरीरामध्ये इन्सुलिन या अंत:स्रावींची (हार्मोन्स) निर्मिती न होणे किंवा त्याला अवरोध निर्माण होणे. अन्नाच्या चयापचयासाठी स्वादुपिंडामध्ये स्रवल्या जाणाऱ्या काही अंत:स्रावींपैकी इन्सुलिनची फार आवश्यकता असते. इन्सुलिनच्या अभावामुळे चयापचय क्रियेमध्ये समतोल राहत नाही. त्यामुळे शरीराचे नीटसे पोषण होत नाही. मधुमेह असलेल्या बालकांना आज उडण्याचे बळ हे उडाणच्या माध्यमातून मिळत आहे. खऱ्या अर्थाने उडाण मधुमेही बालकांसाठी विघ्नहर्त्याच्या भूमिकेत आहे.

​10 वर्षांची ती चिमुकली द्विधा अवस्थेत होती. एकीकडे स्वतःच्या आई-बापानेच तिच्यासमोर रॉकेलचा डब्बा, काडीपेटी आणून ठेवली. तु समजदार आहेस काय करायचं ते तुला सांगायला नको. असं म्हणून ते निघून गेले. तर दुसरीकडे तिचे प्रेमळ उडाणचे कुटुंब होते, तिची स्वप्न होती, सुंदर आयुष्य जगण्याची महत्त्वकांक्षा होती. आत्महत्या करुन संपवून टाकावे का संगळे क्षणार्धात असा विचार मनात आला. जिथे सख्ख्या आई-बापालाच पोटची मुलगी नकोये तिथे समाजाकडून काय अपेक्षा करणार हा विचार तिच्या मनात आला. तिने डब्बा उचलला अंगावर ओतला. डोळ्यातले अश्रू सुद्धा त्यात एकत्र झाले. आता फक्त एका सेकंदाचा अवकाश आणि ती कायमची निघून जाणार होती. धगधगत्या ज्वाला तिला त्यांच्यात सामावून घेणार होत्या. पण अचानक तिच्या डोळ्यांसमोर आईपेक्षा जास्त जीव लावणाऱ्या डॉ. अर्चना सारडा यांचा प्रेमळ आणि हसरा चेहरा आला. आणि तिने मरण्याचा विचार सोडला. उडाणच्या अनामिकाची (नाव बदललेले आहे) ही कहानी… पुढे तिची संपूर्ण जबाबदारी संस्थेने घेतली. तिचे शिक्षण उडाणने केले. डीएड, बीएड होऊन ती शिक्षिका म्हणून स्वतःच्या पायांवर उभी राहिली. तिचे लग्नही झाले. आज तिला एक गोंडस मुलगी आहे. उडाणच्या मदतीने तिने एक व्यवसायही सुरु केलाय. आपल्या या नव्या आयुष्याचे श्रेय ती उडाण आणि डॉ. अर्चना सारडा यांना देते. अशा हजारो मुलांच आयुष्य उडाणने मार्गी लावलंय. त्यांना जगण्याला बळ आणि उद्देश दोन्ही दिलेत. उडाण आज मधुमेही बालक आणि पालक या दोहोंसाठी विघ्नहर्त्याच्या भूमिकेत आहे. एकदा बालक उडाणमध्ये आले की त्याचे सगळे सुख, दुःख, यश, अपयश या सगळ्यात संस्था कुटुंब, मित्राप्रमाणे त्यांच्या सोबत असते. हाच तो टर्निंग पॉईंट 2000 ची घटना. एक पालक आपल्या 8-9 वर्षांच्या मुलीला घेऊन डॉ. सारडा यांच्याकडे आले. दोघेही ग्रामीण भागातले. टाईप-1 मधुमेह असलेल्या या मुलीची परिस्थिती गंभीर होती. त्यांनी मुलीला मॅडमच्या टेबलावर टाकले आणि म्हणाले ही मुलगी वाचली तर आम्हाला सांगा नाहीतर तुम्हीच इकडे तिला अग्निडाग देऊन टाका. आम्ही आता थकलोय. आमची कुठल्याही गोष्टीची तयारीही नाही आणि आमची तशी परिस्थितीही नाही. डॉ. अर्चना यांनी या मुलीवर मोफत उपचार केले. तिच्या घरच्यांशी बोलल्यावर लक्षात आले की मुलीच्या जन्मापासून आजपर्यंत तिच्या उपचारांसाठी थोडेथोडे करुन त्यांची सर्व जमीन, घर गेले. मधुमेहाचे लवकर निदान झाले नाही. निदान झाल्यानंतरही ती दर 3 महिन्याला आजारी पडत असे. त्यांची सर्व जमापुंजी मुलीवर संपली. त्यामुळे शेवटी निराश झालेले ते आई-वडिल तिला डॉ. सारडांकडे घेऊन आले. आणि हाच तो टर्निंग पॉईंट होता जिथून संस्थेची सुरुवात झाली. साहसचे उडाण झाले 2000 पासून 2005 पर्यंत साहस या नावाने प्रकल्प सुरु होता. डॉ. सारडा दाम्प्त्याने मधुमेह असलेल्या बालकांना मदत करण्यास सुरुवात केली. आपल्या कमाईतला काही हिस्सा, कुटुंबीय, मित्र यांच्याकडून निधी घेऊन सुरुवातीला प्रकल्प सुरु होता. मात्र जसजसे काम वाढत गेले तसतशी निधीची आवश्यकता इतर सर्व गोष्टींचीही गरज वाढली. 2005 मध्ये संस्थेची नोंदणी करण्यात आली. आणि साहसचे नाव बदलून उडाण करण्यात आले. जन्मापासूनच शरीरात इन्सुलिनची निर्मिती न होणाऱ्या किंवा इन्सुलिन निर्मितीसंबंधित अनेक गंभीर प्रश्न असणाऱ्या प्रत्येक बालमधुमेहीला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावे लागते. एकीकडे इन्सुलिन, सिरींज, मधुमेह तपासणीसाठी ग्लुकोमीटर, त्याच्या पट्ट्या असा वारेमाप खर्च तर दुसरीकडे इन्सुलिन घेणे, मधुमेहाची तपासणी करणे आणि आहार याबाबत मार्गदर्शनाचा अभाव. त्यामुळे या आजाराबाबत अज्ञानच मोठ्या प्रमाणावर आहे. रक्तातली साखर तपासणी, इन्सुलिन कसे घ्यायचे या सर्व गोष्टी बालकांना उडाणमध्ये शिकवल्या जातात. उडाणची 7-8 वर्षांची मुलेही स्वतःचे स्वतः इन्सुलिन घेतात. स्वतःच्या हाताने इन्सुलिन टोचतात इन्सुलिन किती घ्यायचे याची मात्रा ही मुलांच्या शरीरातील मधुमेहाच्या पातळीवरून ठरवली जाते. त्यामुळे दिवसातून किमान तीन वेळा मधुमेहाची तपासणी करावी लागते. मूल दिवसातून चार वेळा खात असेल तर चार वेळा आणि झोपताना एकदा असे पाच वेळा इन्सुलिन घेणे गरजेचे असते. एकंदर आठ ते नऊ वेळा टोचून घ्यावे लागते. अगदी छोटी मुलेही स्वतःच्या हाताने इन्सुलिन टोचून घेतात. पालकांचे विशेष प्रशिक्षण टाईप-1 मधुमेहाबाबत जागरुकता नसल्यामुळे पालकांना आपल्या चिमुरड्या बालकाला मधुमेह झाला आहे हा धक्का पचवायला बराच वेळ लागतो. हा आजार आयुष्यभराचा असतो. यामुळेच पालक कोलमडून पडतात. अशा पालकांसाठी आज उडाण एक भक्कम आधार आहे. एकदा पालक मुलांना संस्थेत घेऊन आले की त्यानंतर त्यांचे अर्धे टेन्शन कमी होते. याठिकाणी सुरुवातीला बालकांच्या सर्व तपासण्या व्यवस्थितपणे केल्या जातात. त्यानंतर पालकांचे समुपदेशन केले जाते. यामध्ये त्यांचे सर्व अज्ञान दूर केले जाते. बालकाशी कसे वागावे, त्याला काय व कसे खाऊ घालावे अशा अनेक गोष्टी याठिकाणी पालकांना शिकवल्या जातात. पालकांचे विशेष प्रशिक्षण घेतले जाते. संस्थेत 1313 मुले संस्थेच्या सुरुवातीविषयी डॉ. संपत सारडा म्हणाले, 2000 साली आलेल्या एका मुलीचे मोफत उपचार केले. तिच्या कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीविषयी कळाले. आणि येथूनच या प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवातीला मुलेच नव्हती. त्यावेळी आमच्या लक्षात आले की ही मुले वाचतच नाही. साहस नावाने प्रकल्प सुरु झाला. पुढे याचे नाव उडाण झाले. सध्या आमच्या संस्थेत 1313 मुले आहेत. यात 625 मुली आणि 688 मुले आहेत. 24 तास हेल्पलाईन पालक, मुले यांना आजाराबाबत संपूर्ण माहिती ही विविध खेळ, चित्रे यांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने समजावली जाते. कोणतीही अडचण आली तर तत्परतने मार्गदर्शन करण्यासाठी उडाणमार्फत 24 तास हेल्पलाईन चालवली जाते. या हेल्पलाईनवर दिवसाला 100 ते 150 कॉल येत असल्याचे पुजा ताई सांगतात. इतकेच नव्हे तर उपचाराव्यतिरिक्त मुलांचा विकास, कौटुंबिक प्रश्न, किशोरअवस्थेतील अडचणी, लग्न, शिक्षण, नोकरी अशा विविध टप्प्यांवर उडाण मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळेच आज अनेक मुले विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये आमची मुले नाहीत, हे पुजाताई अभिमानाने सांगतात. डॉक्टर देवापेक्षा कमी नाही उडाणमध्ये उपस्थित पालकांशी संवाद साधला. यावेळी 9 वर्षीय कादंबरीच्या आई त्रिवेणी डोंगरे म्हणाल्या, डॉक्टर हे देवापेक्षा कमी नाही. याची प्रचिती मला उडाणमध्ये आल्यावर आली. आम्ही ग्रामीण भागातील आहोत. मी शेती करते. त्यामुळे एवढ्या कमी वयातही मधुमेह होऊ शकतो याबाबत आम्हाला काहीच माहित नव्हते. मात्र उडाणमध्ये आल्यावर आम्हाला खूप सहानुभूती आणि प्रेम मिळाले. जे आम्ही आयुष्यभर विसरु शकत नाही. माझ्या मुलीची खूप मोठी स्वप्न आहेत आज तिची स्वप्न उडाणमुळे साकार होतील. जळगावचे सौरभ पाटील म्हणाले, माझा मुलगा तनय 2 वर्षांचा असताना आम्हाला त्याला मधुमेह असल्याचे कळाले. सुरुवातीला आमच्यासमोर फक्त अंधार होता. पण नंतर आम्हाला उडाणची माहिती मिळाली. आम्ही याठिकाणी आलो. उडाणने आम्हाला सर्व प्रकारची मदत केली. याठिकाणी सर्व तपासण्या मोफत होतात. त्यांच्या हेल्पलाईनवर आम्ही कधीही कॉल करु शकतो. उडाणमुळेच स्वतःच्या पायावर उभा संस्थेत आज कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले कमलेश आणि मंजुषा स्वतः टाईप-1 मधुमेही आहेत. कमलेश चित्ते म्हणाला, मला 13 वर्षांपूर्वी टाईप-1 मधुमेह असल्याचे निदान झाले. त्यावेळी मी उडाणमध्ये आलो. आणि आज मी उडाणमुळेच स्वतःच्या पायावर उभा आहे. उडाणमुळेच मला जगण्याची आशा मिळाली. मंजुषा बर्वे म्हणाली, मला वयाच्या 12 व्या वर्षी टाईप-1 मधुमेह झाला. तेव्हापासून मी उडाणशी जोडले गेले. आणि आज मी याठिकाणीच काम करत असल्याने समाधान वाटते. अंधश्रद्धेमुळे 2 बालके गमावली टाईप-1 मधुमेहीच्या पालक आणि उडाण संस्थेतील पूजा दुसाद सांगतात, इन्सुलिन इंजेक्शन दररोज पाच वेळा घ्यायचे म्हणजे काही गंभीर आजार असल्याचा गैरसमज मोठ्या प्रमाणात समाजात आहे. विशेषत: ग्रामीण भागात अनेक पालक मधुमेह पूर्णपणे बरा होईल, इंजेक्शनची गरज नाही अशा भूलथापांना बळी पडून झाडपाला, आयुर्वेदिक, बाबा-फकीर अशा उपचारांच्या मागे धावतात. या अंधश्रद्धेमुळेच उडाणने आपली 2 बालके गमावल्याचे त्या सांगतात. टाईप-1 मधुमेह म्हणजे काय? टाईप-1 मधुमेह मधुमेह म्हणजे शरीरामध्ये इन्सुलिन या अंत:स्रावींची (हार्मोन्स) निर्मिती न होणे किंवा त्याला अवरोध निर्माण होणे. अन्नाच्या चयापचयासाठी स्वादुपिंडामध्ये स्रवल्या जाणाऱ्या काही अंत:स्रावींपैकी इन्सुलिनची फार आवश्यकता असते. इन्सुलिनच्या अभावामुळे चयापचय क्रियेमध्ये समतोल राहत नाही. त्यामुळे शरीराचे नीटसे पोषण होत नाही. मधुमेह असलेल्या बालकांना आज उडण्याचे बळ हे उडाणच्या माध्यमातून मिळत आहे. खऱ्या अर्थाने उडाण मधुमेही बालकांसाठी विघ्नहर्त्याच्या भूमिकेत आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment