दीनानाथ रुग्णालयाची उडवाउडवीची उत्तरे:घैसास यांना डिपॉझिट मागण्याची दुर्बुद्धी सूचल्याचे सांगत केळकरांचा PC तून काढता पाय

दीनानाथ रुग्णालयाची उडवाउडवीची उत्तरे:घैसास यांना डिपॉझिट मागण्याची दुर्बुद्धी सूचल्याचे सांगत केळकरांचा PC तून काढता पाय

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण बाबत सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल सादर केला आहे. डॉ. सुश्रुत घैसास हे रुग्णालयाचे मानद प्रसुती तज्ञ आहे. मागील दहा वर्ष ते रुग्णालयात काम करत आहे त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा मध्ये त्यांनी सांगितले की, माझ्यावर सध्याच्या परिस्थितीत दबाव निर्माण झाला आहे. मला माझ्या कुटुंबाची चिंता आहे, माझ्या कामावर देखील परिणाम होत आहे, मी रात्री झोपू शकत नाही, रुग्णालयाची देखील बदनामी होत आहे त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे. विश्वस्त मंडळ यांच्या समोर त्यांचा राजीनामा ठेवून मंजूर केला जाईल. गुरवार पासून ते सेवेतून बाजूला होतील. त्यांच्याकडील रुग्ण इतर डॉक्टर यांच्याकडे वर्ग करण्यात येईल असे मत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी डॉ. केळकर म्हणाले, रुग्णालय स्टाफ यांनी योग्यप्रकारे बोलावे त्याकरीता त्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येईल. शासनाचे तीन अहवाल आल्यावर याबाबत आम्ही आमची भूमिका मांडू. मनपाने आईचा मृत्यूस जबाबदार कोण याबाबत बैठक घेतली आहे. गुंतागुंतीच्या आणि मोठ्या खर्चाच्या प्रकरणात डिपॉझिट निधी घेतला जातो. रुग्णालय यांच्याकडून डिपॉझिट रक्कम कधी लिहिली जात नाही, पण त्यादिवशी राहू, केतू मध्ये आले माहिती नाही डॉक्टर यांच्याशी बोलणे करून संबंधित यांनी एका चौकटीत रक्कम लिहिली. जे रुग्णाचे हॉस्पिटलने टॅक्स थकवला नसून याबाबत न्यायालयात केस सुरू आहे त्याठिकाणी आम्ही कर भरू. मनपाची टॅक्स आकारणी पद्धत ही कमर्शियल केली आहे त्याबाबत आम्ही न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली आहे. व्यावसायिक दराने कर लावला जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. चॅरिटेबल आम्ही काम करतो की नाही याबाबत धर्मदाय आयुक्त यांना दर महिन्याला आम्ही अहवाल सादर करतो. असंवेदनशील म्हणजे कामाच्या गर्दीत मनुष्याला जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आपल्या वागण्यातून संवेदनशीलता दिसून आली पाहिजे. रुग्ण साडेपाच तास रुग्णालयात होते त्यावर उपचार झाले की नाही याबाबत संबंधित चौकशी समिती समोर निवेदन झाले. मला सीएमओ कार्यालय मधून फोन आला होता त्याबाबत मी रुग्ण नातेवाईक यांच्याशी बोलणे करून त्यांना जितके पैसे असतील तेवढा भरा सांगितले होते. एखादा रुग्ण ओपीडी मध्ये आला आणि अचानक निघून गेला तर त्याबाबत पोलिस तक्रार दिली जात नाही. अनेकदा आमच्याकडे बेड उपलब्ध नसते. अनेक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात रोज इमर्जन्सी असतात.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment