जिल्हाधिकाऱ्यांनी उखाण्यातून केली महिला मतदारांची उत्साहात जनजागृती:कन्नड येथे मतदान वाढीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न, गावागावात बैठका

जिल्हाधिकाऱ्यांनी उखाण्यातून केली महिला मतदारांची उत्साहात जनजागृती:कन्नड येथे मतदान वाढीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न, गावागावात बैठका

कन्नड येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महिला मतदार जनजागृती कार्यक्रमात उखाणा घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. उखाणा घेताना ते म्हणाले, ‘तुम्हाला आम्हाला घ्यायची काळजी लोकशाहीची, करुणाचे नाव घेतो मला झाली घाई मतदानाची”” असा उखाणा घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. महिलांत मतदानाची जागृती व्हावी तसेच महिला कर्मचाऱ्यांनीदेखील संधी समजून राष्ट्रीय कार्यक्रमात मनापासून सहभागी होऊन महिला मतदारांना प्रोत्साहित-प्रेरित करावे या उद्देशाने कन्नड येथील नवोदय विद्यालयात स्वीप पथकाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सर्व महिला कर्मचारी असून महिलांनी उखाणे घेऊनदेखील महिलांना मतदानासाठी जागृती करता येणे शक्य असल्याचे सांगून महिलांनी उखाणा घेणे अपेक्षित आहे असे म्हणून स्वतः उखाणा घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मतदान वाढीसाठी काही नवीन संकल्पना असेल तर त्या मला डायरेक्ट सुचवा नक्कीच अमलात आणू असे आवाहन ही जिल्हाधिकारी स्वामी यांनी या वेळी केले. या ठिकाणी महिलांची संख्या मोठी आहे आणि महिला याच खऱ्या अर्थाने शक्तिमान आहेत. महिला अधिकारी, कर्मचारी अपमान सहन करूनही आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतात. निवडणुकीचे काम टाळण्याऐवजी हे काम करायला मिळते याचा अभिमान बाळगायला हवा. मतदार यादीत आपले, आपल्या घरच्यांचे, नातलगांचे नाव आहे की नाही याची खात्री करून घ्या. मोबाइलवर जसे आपण एकमेकांना वेगवेगळे संदेश पाठवतो तसेच संदेश मतदान करून घेण्यासाठी पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा स्वीप पथकप्रमुख सुनीता शिंदे, गटशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ, तालुका आरोग्य अधिकारी योगेश साळुंखे यांची मंचावर उपस्थिती होती. स्वीप पथकाने पथनाट्य, गीते सादर करत मतदार जनजागृती उपक्रमाची झलक दाखवली. यासाठी स्वीप पथकप्रमुख डॉ. प्रा. सुनीता शिंदे, योगेश पाटील, सदस्य भाऊसाहेब सोननीस, दीपक सोनवणे पंढरीनाथ जाधव, ज्ञानेश्वर इस्तापे, शीतल चौधरी, प्रवीण दाभाडे यांनी परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. योगेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कर्मचाऱ्यांनी घेतले परिश्रम

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment