हिंगोलीतील शाळांमधून बसविलेल्या तक्रार पेट्यांची अचानक तपासणी करणार:पेट्या नसलेल्या शाळेवर कारवाई- जिल्हाधिकारी गोयल

हिंगोलीतील शाळांमधून बसविलेल्या तक्रार पेट्यांची अचानक तपासणी करणार:पेट्या नसलेल्या शाळेवर कारवाई- जिल्हाधिकारी गोयल

हिंगोली – जिल्ह्यातील शाळांमधून विद्यार्थिनींना तक्रार करता यावी यासाठी तक्रार पेट्या बसवून घ्याव्यात जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून अचानक या तक्रार पेट्यांची तपासणी केली जाईल ज्या शाळेमधून या पेट्या बसवल्या नाहीत त्या ठिकाणी शाळा प्रशासनावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिला आहेयेथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण यावर तेजस्विनी कार्यशाळा झाली. यावेळी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, प्रा. सुधाकर इंगोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी संदिप सोनटक्के, प्रशांत दिग्रसकर, मोटार वाहन निरीक्षक अतुल बानापुरे, प्रदीप खंडपासोळे, दिशा फाउंडेशनच्या शालिनी नाईक, पोलिस निरिक्षक सुधीर वाघ, मुख्याध्यापक, शिक्षक, पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी मार्गदर्शन केले. यामधे प्रामुख्याने स्कूल बस वाहतुकीबाबत नियमावली, मुलांची शाळेतील सुरक्षा, शाळेची जबाबदारी याबाबत सूचना केल्या. याशिवाय शाळेमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, शाळेत तक्रार पेटी ठेवणे, स्कूल वाहनात सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे, शासनाच्या नियमानुसार प्रतेक शाळेतील कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी करून घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील शाळांमधून अनेक वेळा विद्यार्थिनी तक्रारी मांडत नाहीत. त्यामुळे शाळांनी तक्रार पेट्या बसविणे आवश्यक आहे. या तक्रार पेट्या वेळोवेळी उघडून त्यातील तक्रारींची सोडवणूक केली पाहिजे. ज्या शाळेत तक्रार पेट्या नाहीत त्यांनी तातडीने तक्रार पेट्या बसवून घ्याव्यात. पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने या तक्रार पेट्यांची अचानक तपासणी केली जाईल. ज्या ठिकाणी तक्रार पेट्या नसतील त्या शाळांवर कारवाई केली जाईल असा इशारा गोयल यांनी दिला. तसेच या तक्रार पेट्यामध्ये असलेल्या तक्रारींची शाळा प्रशासनाने सोडवणूक करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी पोलिस अधीक्षक कोकाटे यांनीही मार्गदर्शन केले. पोलिस विभागाच्या वतीने स्थानिक पातळीवर पोलिस काका, पोलिस दीदी यासारखे उपक्रम राबवित असून पोलिस ठाणे स्तरावर पोलिस अमलदारानी हद्दीतील प्रत्येक शाळेला भेट देऊन बालकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन गुन्ह्यास प्रतिबंध करीत असल्याचे सांगीतले. विद्यार्थिनींनी त्यांच्या तक्रारी मांडाव्यात विद्यार्थिनींचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळांमधून विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्यांना धडा शिकवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

​हिंगोली – जिल्ह्यातील शाळांमधून विद्यार्थिनींना तक्रार करता यावी यासाठी तक्रार पेट्या बसवून घ्याव्यात जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून अचानक या तक्रार पेट्यांची तपासणी केली जाईल ज्या शाळेमधून या पेट्या बसवल्या नाहीत त्या ठिकाणी शाळा प्रशासनावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिला आहेयेथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण यावर तेजस्विनी कार्यशाळा झाली. यावेळी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, प्रा. सुधाकर इंगोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी संदिप सोनटक्के, प्रशांत दिग्रसकर, मोटार वाहन निरीक्षक अतुल बानापुरे, प्रदीप खंडपासोळे, दिशा फाउंडेशनच्या शालिनी नाईक, पोलिस निरिक्षक सुधीर वाघ, मुख्याध्यापक, शिक्षक, पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी मार्गदर्शन केले. यामधे प्रामुख्याने स्कूल बस वाहतुकीबाबत नियमावली, मुलांची शाळेतील सुरक्षा, शाळेची जबाबदारी याबाबत सूचना केल्या. याशिवाय शाळेमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, शाळेत तक्रार पेटी ठेवणे, स्कूल वाहनात सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे, शासनाच्या नियमानुसार प्रतेक शाळेतील कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी करून घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील शाळांमधून अनेक वेळा विद्यार्थिनी तक्रारी मांडत नाहीत. त्यामुळे शाळांनी तक्रार पेट्या बसविणे आवश्यक आहे. या तक्रार पेट्या वेळोवेळी उघडून त्यातील तक्रारींची सोडवणूक केली पाहिजे. ज्या शाळेत तक्रार पेट्या नाहीत त्यांनी तातडीने तक्रार पेट्या बसवून घ्याव्यात. पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने या तक्रार पेट्यांची अचानक तपासणी केली जाईल. ज्या ठिकाणी तक्रार पेट्या नसतील त्या शाळांवर कारवाई केली जाईल असा इशारा गोयल यांनी दिला. तसेच या तक्रार पेट्यामध्ये असलेल्या तक्रारींची शाळा प्रशासनाने सोडवणूक करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी पोलिस अधीक्षक कोकाटे यांनीही मार्गदर्शन केले. पोलिस विभागाच्या वतीने स्थानिक पातळीवर पोलिस काका, पोलिस दीदी यासारखे उपक्रम राबवित असून पोलिस ठाणे स्तरावर पोलिस अमलदारानी हद्दीतील प्रत्येक शाळेला भेट देऊन बालकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन गुन्ह्यास प्रतिबंध करीत असल्याचे सांगीतले. विद्यार्थिनींनी त्यांच्या तक्रारी मांडाव्यात विद्यार्थिनींचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळांमधून विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्यांना धडा शिकवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment