दिव्य मराठी अपडेट्स:नाशिकमध्ये आज काँग्रेसकडून सद्भावना रॅली, दिवसभराच्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… बीडमध्ये 300 वर्षांपूर्वींच्या वटवृक्षाने घेतला पेट बीड: लिंबागणेश येथील बसस्थानकावरील अनेक पिढ्यांचा साक्षीदार असणाऱ्या 300 वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाने आज सकाळी पेट घेतला. आग इतकी भयंकर होती की स्थानिकांना विझवता आली नाही. बीड अग्निशमन विभागाला फोनवरून याची माहिती दिली. बीड नगर परिषद अग्निशमन दलाचे रमेश आदमाने, अक्षय नखाते, अनिकेत कपाळे हे वाहनासह घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी आग विझवणे सुरू केले आहे. नाशिकमध्ये आज काँग्रेसकडून सद्भावना रॅली नाशिकमध्ये आज काँग्रेसकडून सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य नेते उपस्थित असतील. नाशिकमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेसकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा स्मारकापासून ते गाडगे माहाराज पुलापर्यंत ही रॅली असणार आहे. विजय वडेट्टीवारांची त्या वक्तव्यावरुन ‘माफी’ काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मात्र, यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी प्रसार माध्यमांवरच केला आहे. अर्धवट दाखवण्याच्या भरवशावर देशात काहीतरी वेगळे वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम काही ठराविक माध्यमे करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. आपल्या वक्तव्यावरून मी माफी मागत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा वांद्रेच्या लिंक स्क्वेअर मॉलमध्ये भीषण आग मुंबईतील वांद्रे येथील लिंकिन रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये असलेल्या क्रोमा शोरूममध्ये अचानक भीषण आग लागली. आगीच्या घटनेमुळे क्रोमा शोरूमचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे 4 वाजता आग लागली असून अग्निशमन दल अजूनही आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. लिंक स्क्वेअर मॉल ही चार मजली इमारत आहे. क्रोमा शोरूमच्या तळघरात ही आग लागली होती. सविस्तर वाचा शरद पवारांना अजित पवारांचा पुन्हा मोठा धक्का जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन मातब्बर नेते आता अजित पवार यांच्या नेतृत्वात त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांचा समावेश आहे. या दोघांच्या नेतृत्वात अनेक स्थानिक कार्यकर्ते देखील अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सविस्तर वाचा चंद्रहार पाटलांच्या गुप्त बैठकीचे व्हिडिओ व्हायरल लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चंद्रहार पाटील यांनी हे वृत्त फेटाळले होते. मात्र त्यानंतर आता चंद्रहार पाटील यांचे दिल्लीतील एका बैठकीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सविस्तर वाचा बीडमध्ये शेतातील विहिरीतून पळवले पाणी शेतकऱ्याने शेतातील फळझाडे व गुरांसाठी राखून ठेवलेले विहिरीतील पाणी शुक्रवारी (25 एप्रिल) रात्री चोरट्यांनी 3 टँकर लावून रातोरात लंपास केले. हा प्रकार बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी गावात उघडकीस आला. याबाबत शेतकऱ्याच्या मुलाने भावनिक पोस्ट करत व्यथा मांडली. सविस्तर वाचा शेअर बाजारात फ्लॅट ट्रेडिंग आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग दिवशी, आज शेअर बाजार वाढीनंतर घसरत आहे. सेन्सेक्स २० अंकांनी वाढून ८०,२३० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी खाली आहे, तो २० अंकांनी घसरून २४,३०० वर व्यवहार करत आहे. सेन्सेक्सच्या ३० पैकी १५ शेअर्समध्ये वाढ झाली आहे. रिलायन्स, लार्सन अँड टुब्रो आणि टेक महिंद्राचे शेअर्स १.५% पर्यंत वाढले आहेत. त्याच वेळी, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स सुमारे २% ने घसरले आहेत. सविस्तर वाचा