दिव्य मराठी अपडेट्स:मुंबईतील मंदिरावरील कारवाईविरोधात जैन समाजाचे आंदोलन, मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… जैन मंदिर पाडल्याच्या विरोधात आंदोलन मुंबईतील विलेपार्ले भागात असलेले जुने जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी पाडले होते. या कारवाईनंतर देशभरातील जैन समुदाय संतप्त झाला आहे. मुंबई मनपाच्या कारवाईविरोधात जैन समाजाकडून अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले. राज ठाकरे मोदी-शहांशी कोणत्या भाषेत बोलता?: राऊतांचा सवाल मराठीवर हिंदी नाही तर गुजराती भाषेचे आक्रमण होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी-मराठी हा मुद्दा उपस्थित केला असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या आंदोलनावरुनही त्यांनी निशाणा साधला. सविस्तर वाचा हिंदी-जबरदस्ती कश्या साठी?- जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील हिंदी भाषेची सक्ती करण्याला विरोध केला आहे. आव्हाड यांनी ट्वीट करत हिंदी-जबरदस्ती कश्या साठी? असा सवाल त्यांनी केला. या संदर्भात आव्हाड यांनी एक पोस्ट शेअर करत या बाबत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सविस्तर वाचा 5 वर्षे मेहनत घ्या, पुन्हा काँग्रेस सत्तेत येईल, पटोलेंकडूनही ‘बूस्टर डोस’ हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर नाना पटोले यांनी पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मनातील खदखद नाना पटोले यांच्यासमोर व्यक्त केली. नाना पटोले यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांनी पाच वर्ष मेहनत घ्यावी. पाच वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत येईल, असा विश्वासाचा बूस्टर डोस दिला. सविस्तर वाचा