दिव्य मराठी अपडेट्स:उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, पोलिस आणि अधिकाऱ्यांना घेतला चावा

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. काही पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतल्याची माहिती आहे. अजित पवार हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर दौऱ्यावर असताना ही घटना घडली. अचानक मधमाशांनी हल्ला केल्यामुळे ताफ्यातील अनेकांची चांगलीच धावपळ उडाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित गाडीमध्ये बसवण्यात आले. छत्रपती संभाजीनगर: कोयत्याचा धाक दाखवून सव्वातीन लाख लंपास छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी गळ्यावर कोयता ठेवत सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास केल्याचे घटना घडली आहे. हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. एमआयडीसी वाळून हद्दीतील विटावा गावात एसबीआय बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात हा चोरीचा थरार घडला. भंडाऱ्यात ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघात, 4 ठार मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, भंडारा महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेल समोर रविवारी रात्री ही घटना रविवार रात्री 11 च्या सुमारास घडली. अपघातानंतर महामारगावर वाहतूक कोंडी झाली होती.सविस्तर वाचा
सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला शेअर बाजार आज तेजीत आहे. सेन्सेक्स ४०० पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह ७९,६०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील सुमारे १०० अंकांनी वर आहे, तो २४,१५० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज बँकिंग, ऑटो आणि एनर्जी शेअर्समध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे, एफएमसीजी आणि आयटी शेअर्स दबावाखाली व्यवहार करत आहेत. सविस्तर वाचा