दिव्य मराठी विशेष:केवळ 47 बालकांच्या दत्तक विधानासाठी महाराष्ट्रात 8 हजार 202 पालक प्रतीक्षेत
नोव्हेंबर महिना दत्तक जाणीव जागृती महिना म्हणून साजरा होत आहे. राज्यात ८ हजार २०२ पालकांनी (० ते २ वर्षे) दत्तक बाळासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी एकट्या संभाजीनगरात ५४० नोंदणी झाली आहे, तर दुसरीकडे ४७ बालकेच दत्तक विधानासाठी उपलब्ध आहेत. अशा स्थितीत दत्तक बाळांचे पालक बनण्यासाठीही पालकांना ५ ते ६ वर्षे थांबवण्याची वेळ आली आहे. याकरिता प्राधान्य बदलल्यास लवकर बाळ िमळण्याच्या शक्यतेवर पालकांनी विचार करायला हवा. विशेष मुलांनाही कुटुंब मिळाले पाहिजे याचा विचार होणे गरजेचे असा सूर आहे. वंशवृद्धी आणि कुटुंब निर्माण करण्यासाठी नवी पिढी गरजेची आहे. मात्र, ज्या दांपत्यांना मूल होत नाही अशांसाठी दत्तक विधान हा पर्यायउर्वरित. पान १० दत्तक घेण्यासाठी ‘कारा’च्या संकेतस्थळावर नोंदणी करा सिंगल पॅरेंट महिलांचे प्रमाण अधिक : समाजात वेगाने बदल होत आहे. अशा वेळी दत्तक विधान करण्यात एकल महिला पालकांची संख्या अधिक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगतात. प्राधान्यक्रम बदलणे हा एक पर्याय असू शकतो
‘कारा’(केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण) मार्फत दत्तक विधान केले जाते. यात परदेशातील पालकांचे प्रमाणही मोठे आहे. परदेशातील पालक विशेष मुलांचाही स्वीकार करतात. अनेकदा हे विशेष असणे काही महिन्यांपुरते असते. भारतीय पालकांनी अशा मुलांचा स्वीकार करण्याला प्राधान्य द्यायला हवे. यासोबतच मोठ्या वयाच्या बालकांचाही स्वीकार करावा. – नीलिमा पांडे, अध्यक्ष, साकार संस्था