दिव्य मराठी अपडेट्स:भाजपची पहिली यादी आज; तर मनसेने सलग दोनदा गमावलेल्या भांडूपमधून अमित ठाकरे लढणार

दिव्य मराठी अपडेट्स:भाजपची पहिली यादी आज; तर मनसेने सलग दोनदा गमावलेल्या भांडूपमधून अमित ठाकरे लढणार

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स भाजपची पहिली यादी आज मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यात भाजपने सर्वात आधी बाजी मारली आहे. भाजपच्या केंद्रीय समितीने दिल्लीच्या बैठकीत 110 नावे निश्चित केली आहेत. त्यापैकी 50 ते 60 नावांची पहिली यादी शुक्रवारी दिल्लीतून जाहीर होईल. यात बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश असेल. काही मतदारसंघात चेहरे बदलून धक्केही दिले जातील. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 150 पेक्षा एकही जागा कमी लढवणार नाही, या भूमिकेवर भाजप ठाम आहे. त्यामुळे उर्वरित 138 जागा शिंदेसेना व अजित पवार गटांमध्ये वाटून दिल्या जातील. शिंदे गटाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक ठेवली आहे. त्यात त्यांचा अंतिम निर्णय होईल, तर शुक्रवारी किंवा शनिवारी अजितदादा गटही आपला अंतिम निर्णय जाहीर करतील. त्यानंतर महायुतीचा फॉर्म्युला निश्चित होईल. मनसेने सलग दोनदा गमावलेल्या भांडूपमधून अमित ठाकरे लढणार मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मनसे नेत्यांची बैठक घेऊन रणनीती आखली. राज यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे हेसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. माहिम मतदारसंघातून ते लढतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. मनसेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. खरे तर अमित यांच्यासाठी भांडूप मतदारसंघ सोडायला शिंदेसेनेने तयारी दर्शवली होती. पण राज यांनी माहिम मतदारसंघ निवडला. 2009 मधून इथून मनसेचे नितीन सरदेसाई 48 हजार मतांनी विजयी झाले होते, तर 2014 मध्ये शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्याकडून मनसेचे सरदेसाई व 2019 मध्ये संदीप देशपांडे पराभूत झाले होते. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात यंदा ‘राजपुत्र’ स्वत: उतरणार आहे. जे. जे. रुग्णालयात प्रथमवर्षाच्या विद्यार्थ्याचे रॅगिंग; महाविद्यालयाच्या आवारात नृत्य करण्यास सांगितले मुंबई – ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जे.जे. रुग्णालयामध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी सकाळी विद्यार्थ्याच्या रॅगिंगची तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाची राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा नियमानुसार चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 2024-25 मधील शैक्षणिक वर्षाला 14 ऑक्टोबरपासून नियमित सुरुवात झाली. मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जे.जे. रुग्णालयातही एमबीबीएसचे वर्ग सुरू झाले. दरम्यान, 17 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी महाविद्यालयाच्या आवारामध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्याचे नाव विचारून त्याला नृत्य करण्यास सांगत होते. त्याचदरम्यान तेथून जात असलेल्या रॅगिंगविरोधी समितीच्या एका सदस्यांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर रॅगिंगविरोधी समितीच्या बैठकीमध्ये गुरुवारी ही तक्रार उपस्थित करण्यात आली. ठाण्यात मनपा शाळेतील 44 विद्यार्थ्यांना विषबाधा ठाणे – कळवा येथील एका खासगी शाळेतील 40 हून अधिक विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याच्या घटनेला दोन आठवडे होत नाहीत तोच गुरुवारी दुपारी दिवा येथील आगासन भागातील ठाणे महापालिकेच्या शाळेतील पाचवी ते सहावीच्या वर्गातील 44 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या मध्यान्ह भोजनात पाल मृत अवस्थेत आढळून आली असून विषबाधा झालेल्या 44 विद्यार्थ्यांपैकी 39 मुलांना पोटदुखी आणि उलटीचा जास्त त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर इतर मुलांनाही उपचारासाठी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवा येथील आगासन भागात ठाणे महापालिका शाळा क्रमांक 88 आहे. या शाळेत दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे मधल्या सुटीत खिचडी देण्यात आली होती. या खिचडीतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांना मारहाण : पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा मुंबई – कौटुंबिक वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यात हस्तक्षेप करून तो मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण करणे पिता-पुत्राला महागात पडले आहे. सहा वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी सत्र न्यायालयाने पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांनी आरोपी रुद्रपाल अग्रवाल (60) आणि त्यांचा मुलगा तुषार (29) यांना ही शिक्षा सुनावली आहे. दूध वाहतुकीच्या वाहनात‎आढळली गावठी दारू‎ आळेफाटा – कल्याण -अहिल्यानगर‎महामार्गावर फुग्यांतून गावठी दारू‎वाहतूक करणारी पिकअप जीप ओतूर‎पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील खुबी‎हद्दीत केलेल्या नाकाबंदी दरम्यान‎पकडली. विशेष म्हणजे ही पिकअप‎दूध वाहतूक करणारी असल्याचे दिसून‎आले. ओतूर पोलिसांची खुबी हद्दीत‎कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर‎नाकाबंदी सुरू असताना बुधवारी‎सकाळी कल्याणहून अहिल्यानगरच्या‎दिशेला जाणाऱ्या दूध वाहतुकीची‎बंदिस्त बॉडी असलेल्या पिकअप जीप‎(एमएच 14 एचयू 8764) मध्ये‎ट्यूबच्या फुग्यातून हातभट्टीची गावठी‎ दारू वाहतूक करीत असल्याचे‎निदर्शनास आले. दहा हजारांच्या‎गावठी दारूसह 4 लाख 50 हजार‎रुपयांची पिकअप असा 4 लाख 60‎हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत‎केला. पारगाव येथील सुभाष बाबुराव‎नवले यांच्याकडे विक्री करण्यासाठी तो‎घेऊन जात असल्याचा जबाब दिला.‎याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा‎दाखल करण्यात आला.‎ सांगलीत मध्यरात्री जोरदार पाऊस; शंभर घरांत शिरले पाणी सांगली – सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी मध्यरात्री आणि गुरूवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक घरामध्ये पाणी शिरले. तसेच रस्त्यावर पाणी आल्याने अनेक भागातील वाहतुक व्यवस्था ठप्प झाली होती. दरम्यान 20 ऑक्टोबरपर्यंत हवामान खात्याने सांगली जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. गेले दोन ते तीन दिवस सतत वादळी वारे, विजांचा कडकडाट, मेघगर्जना यारसह जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे काढणीस आलेल्या खरीप पिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. मनी लाँड्रिंग : तमन्ना भाटियाची ईडी चौकशी गुवाहाटी – एचपीझेड टोकन मोबाइल ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात गुरुवारी ईडीने अभिनेत्री तमन्ना भाटियाची चौकशी केली. या प्रकरणात बिटकॉइन आणि इतर काही क्रिप्टोकरन्सीच्या खाणकामाच्या बहाण्याने अनेक गुंतवणूकदारांना फसवण्यात आले होते. ईडीने सांगितले की, 34 वर्षीय अभिनेत्रीचे जबाब येथील प्रादेशिक कार्यालयात पीएमएलए कायद्यांतर्गत नोंदवण्यात आले आहे. तमन्नाला ॲप कंपनीच्या एका कार्यक्रमात “सेलिब्रिटीसारखे दिसण्या’साठी काही पैसे मिळाले होते आणि तिच्याविरुद्ध कोणतेही “गुन्हेगारी’ आरोप नव्हते. ‘इमर्जन्सी’ला परवानगी; लवकरच झळकणार! नवी दिल्ली – बाॅलीवूड अभिनेत्री कंगना राणावतचा चित्रपट ‘इमर्जन्सी’ला सेन्साॅर बाेर्डाने हिरवा कंदील दाखवला. आमच्या चित्रपटाला सेन्साॅरचे प्रमाणपत्र मिळाले आहे, असे कंगनाने साेशल मीडियातून जाहीर केले. तूर्त तरी चित्रपटाची तारीख अद्याप निश्चित नाही. हा चित्रपट आधी 6 सप्टेंबरला प्रदर्शित हाेणार हाेता, परंतु शीख संघटनांच्या विराेधानंतर त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment