दिव्य मराठी अपडेट्स:नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स
मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे आयोजन पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आरोग्य, पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी सायकल रॅली आयोजित करण्यात आली. कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते धर्मवीर संभाजी महाराज पुतळा, डेक्कन जिमखाना अशी ही सायकल रॅली झाली. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. या प्रसंगी पद्मश्री शीतल महाजन, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते. तलवारीने केक कापला; गुन्हा दाखल बुलडाणा – जिल्ह्यातील धाड गावातील शिवाजी महाराज चौकात एकाने तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. पोलिसांना याविषयी माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अतिउत्साही 8 जणांवर गुन्हा दाकल करुन त्यांच्याकडील तलवार जप्त करण्यात आली. अक्षय जीवनलाल बिलांगे, जय पांडे, सुरज लोखंडे, गोलू गुजर, दीपक गुजर, राहुल दळवी, सुरज वाघ व रोशन गणेश शिंदे अशी आरोपींची नावे अाहेत. परीक्षेत फसवणुकीसाठी आता कडक कारवाई नवी दिल्ली – कर्मचारी निवड आयाेगाने (एसएससी) आपल्या भरती परीक्षांमध्ये काेणत्याही घाेटाळ्यात किंवा फसवणुकीबद्दल कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. परीक्षा केंद्रात रफ कागद घेऊन जाणे आणि विना अधिकार परीक्षा साहित्य बाळगणे गंभीर गुन्हा मानला जाईल.
नांदेडमध्ये आ. हंबर्डे भाजपच्या वाटेवरची‎चर्चा फोल; काँग्रेसमध्येच राहणार‎ नांदेड – काँग्रेसचे आ. मोहन हंबर्डे यांनी केंद्रीय मंत्री‎नितीन गडकरी यांची भेट घेताच भाजपत प्रवेश‎करण्याची चर्चा सुरू हाेती. काँग्रेसला भाजप आणखी‎एक धक्का देणार असल्याच्या बातम्या सुरू हाेत्या.‎दरम्यान, सदरील चर्चेत काही अर्थ नसून आ. मोहन‎हंबर्डे पक्ष सोडणार नाहीत. मतदारसंघातील‎विकासकामासाठी ही भेट घेतली होती, असे‎स्पष्टीकरण आमदारांचे सुपुत्र राहुल हंबर्डे व माजी जि.‎प. सदस्य मनोहर शिंदे यांनी दिली.‎
17 सप्टेंबरपर्यंत तुरळक पाऊस शक्य नाशिक – आर्द्रता कमी झाल्यामुळे तसेच बंगालच्या खाडीतील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत झाल्यामुळे राज्यातील पावसाचे वातावरण सध्या निवळलेले आहे. त्यामुळे उत्तर आणि मध्य महाराष्ट्र तसेच छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील बहुतांश भागात 14 ते 17 सप्टेंबर असे 4 दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे. वातावरण अंशत: ढगाळ राहील. दिवसभरातून थाेडा वेळ हलक्या सरी काेसळतील, असा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे. 17 आणि 18 सप्टेंबर असे दाेन दिवस काेकण आणि विदर्भासाठी मात्र पावसाचे प्रमाण वाढेल. तेथे दाेन दिवसांसाठी यलाे अलर्ट जारी करण्यात आला आहे. आखाडा बाळापूर येथून पायी‎ पालखी सोहळा शिर्डीसाठी रवाना‎ हिंगोली – आखाडा बाळापूर येथून पायी पालखी‎सोहळा शिर्डी येथे रवाना झाला आहे. शुक्रवारी या‎पालखी सोहळ्यातील सुमारे 90 पेक्षा अधिक‎भाविकांचा सत्कार करण्यात आला. पालखी‎सोहळ्याचे हे 25 वे वर्ष आहे. हिंगोली, औंढा, जिंतूर,‎मंठा, जालना, छत्रपती संभाजीनगरमार्गे पालखी‎सोहळा शिर्डी येथे पोहोचणार आहे. या वेळी बालाजी‎बोंढारे, शिवराम राऊत, बजरंग शर्मा, सोपान पाटील‎बोंढारे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.‎ खानापूर येथे आज विष्णू महाराज‎ बांडे यांच्या भारुडाचे आयोजन‎ बीड – माजलगाव शहराजवळ असलेल्या खानापूर‎येथे गणेशोत्सवानिमित्त यशवंत गणेश मित्र‎मंडळाच्या वतीने शनिवारी (दि. 14) विष्णू महाराज‎बांडे यांच्या भारुडाचे आयोजन करण्यात आले‎आहे. सायंकाळी 6 ते 8 या दरम्यान हा भारुडांचा‎कार्यक्रम होणार असल्याची माहिती गणेश‎मंडळाच्या वतीने देण्यात आली. भाविक, गणेश‎भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन‎यशवंत गणेश मित्र मंडळाने केले आहे.‎ ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फ्रँक मिसनचे निधन मेलबर्न – ऑस्ट्रेलिया व न्यू साउथ वेल्सचा माजी वेगवान गोलंदाज फ्रँक मिसन यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यानेे 1960-61 च्या प्रसिद्ध मालिकेत वेस्ट इंडिज विरुद्ध 5 कसोटी सामने खेळले व 1961 मध्ये इंग्लंडच्या ॲशेस दौऱ्यात टाचेच्या दुखापतीमुळे त्याची कसोटी कारकीर्द कमी संपली. त्याने 38.50 च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या. यात मेलबर्नमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 58 धावांत 4बळींचा समावेश आहे.

​नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment