दिव्य मराठी अपडेट्स:संतोष देशमुख हत्या प्रकरण; सर्वजातीय, सर्वधर्मीय सामाजिक संघटना, पक्षांच्या वतीने आज जालन्यात मोर्चा
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स
संतोष देशमुख हत्या प्रकरण; सर्वजातीय, सर्वधर्मीय सामाजिक संघटना, पक्षांच्या वतीने आज जालन्यात मोर्चा जालना – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंतक्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी तसेच पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी सर्वजातीय, सर्वधर्मीय सामाजिक संघटना, पक्षांच्या वतीने सकाळी ११ वाजता मोर्चा निघेल. शहरातील विविध भागांतून समूहाने जनआक्रोश मोर्चात सहभागी होणार आहे. यामुळे ज्या-त्या भागातून एका ठिकाणी जमून नंतर जनआक्रोश मोर्चात सहभागी होणार आहेत. यासाठी सकाळी ज्या-त्या भागात एकत्रित येण्याचे आवाहन ज्या-त्या भागातील प्रमुखांनी केले. किसानपुत्र आंदोलनाचे अाजपासून २ दिवस शिबिर जालना – येत्या ११ व १२ जानेवारीरोजी तालुक्यातील खरपुडीयेथील कृषी विज्ञान केंद्रातकिसानपुत्रांचे राज्यस्तरीय चिंतनशिबिर आयोजित करण्यात आलेआहे. या शिबिरात ‘शेतकरीस्वातंत्र्यासाठी न्यायालयीन लढाईचीदिशा’ या विषयावर चर्चा होणारआहे. यात अॅड. सागर पिलारे(कोल्हापूर) हे प्रमुख मार्गदर्शक तरविजयअण्णा बोराडे यांच्या हस्तेशिबिराचे उद्घाटन होणार अाहे.तसेच अॅड. सुभाष खंडागळे(पुसद), अमृत महाजन(अंबाजोगाई), अॅड. महेशगजेंद्रगडकर (पुणे) अादी विविधविषयांवर मांडणी करणार आहेत.दरम्यान, शिबिराला महाराष्ट्रातीलविविध जिल्ह्यातून ४० ते ५०शिबिरार्थी सहभागी होणार आहे. संजय पाटील पुन्हा हाती धरणार भाजपचे कमळ सांगली – लोकसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा तत्कालीन खासदार संजय पाटील यांना उमेदवारी दिली, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षात प्रवेश करून तासगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर संजय पाटील पुन्हा एकदा भाजपत प्रवेश करणार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपत प्रवेश करून त्यांनी खासदारकी मिळवली होती. मागील लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता. देशमुख, सूर्यवंशी यांच्याहत्येच्या निषेधार्थ उद्या मोर्चा धाराशिव – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या अारोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करुन खून करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी धाराशिवकर रस्त्यावर उतरणार आहेत. दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे. येथील या मोर्चास सकाळी १० वाजता राष्ट्रमाता जिजाऊ चौकातून प्रारंभ होईल. पुढे बसस्थानकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल. नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सांगलीत सात वर्षांपूर्वीचा खून; पाच जणांना जन्मठेप सांगली – कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित तमाशात धिंगाणा करणाऱ्यांची पंचकमिटीकडे तक्रार केल्याच्या रागातून अशोक तानाजी भोसले यांचा गुप्ती, कुकरीने भोसकून निर्घृण खून केला होता. या खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी ५ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यातील एका आरोपीची सुनावणी सुरू असताना मृत्यू झाला. संदीप दादासो चौगुले (२६), विशाल बिरुदेव चौगुले (२३), नानासो ऊर्फ सागर माणिक चौगुले (२०), कुंडलिक ऊर्फ कोंडीराम पांडुरंग कनप (२५) आणि विजय अप्पासो चौगुले (२३, सर्व रा. अग्रण धुळगाव) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. सागर बाळासो चौगुले याचा मृत्यू झाला. बिरू पांडुरंग कोळेकर या संशयिताला निर्दोष करण्यात आले आहे. संदीप व विशाल चौगुले गेली ७ वर्षे न्यायालयीन कोठडीत आहेत. धुळगाव येथे यल्लम्मा देवीची यात्रा प्रत्येक वर्षी भरत असते. २ डिसेंबर २०१७ रोजी हा खून करण्यात आला. “ज्येष्ठ पत्रकारांना २० हजार सन्मान निधी लवकरच’ पुणे – “आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील निधी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, हे मान्य करतानाच त्याला लवकरच गती देण्यात येईल,” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीची रक्कम ११ हजारांवरून २० हजार रुपये करण्याचे काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने जाहीर केले. त्यानुसार शासन आदेश काढण्यात आला. हा निधी लवकरच देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी या वेळी सांगितले. कोपरगावात माजी उपनगराध्यक्षाची आत्महत्या कोपरगाव – कोपरगावचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील शिवाजी निखाडे (३३) यांनी विषारी अाैषध प्राशन केले हाेते. गुरुवारी नाशिक येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निखाडे यांनी ७ जानेवारी राेजी सायंकाळी शहरातील येवला नाका परिसरात आपल्याच गाडीत बसून विषारी औषध घेतले हाेते. या घटनेमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. उपनगराध्यक्षांनी हे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्यांना तत्काळ कोपरगाव शहरातील मुळे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना तत्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी प्रकृती खालावल्याने उपचारादरम्यान नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहिण, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी निखाडे यांचे स्वप्नील चिरंजीव हाेत. सांगली : पद्मावती मंदिरातून १५ लाखांचे दागिने लंपास सांगली – आरग (ता. मिरज) येथील पद्मावती मातेच्या मंदिरातून चोरट्यांनी बुधवारी रात्री १५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याने मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यासमोरील लाकडी दरवाजाची कडी तोडली आणि गाभाऱ्यात जात १८ तोळे दागिने लंपास केले. तीन दिवसांपूर्वीच या मंदिरात वार्षिक उत्सव झाला होता. त्यासाठी सांगली, कोल्हापूर, कर्नाटकातून भाविक आले होते. त्याच वेळी चोरट्यांनी पाळत ठेवून हा प्रकार केला असावा असा संशय आहे. मंदिर परिसर आणि आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसत आहेत का, याचा तपास पोलिस घेत आहेत. बनावट खरेदीखतकेल्याने गुन्हा दाखल परभणी – महामार्गालगत जमीन नसताना खोटेखरेदीखत केल्याने मानवतन्यायालयाने फसवणुकीचा गुन्हादाखल करण्याचे आदेश दिले. मानवत न्यायालयात तक्रारदारनागनाथ जंगले यांनी तक्रार दाखलकेली होती. त्यामध्ये बाळासाहेबदेशमुख यांनी त्यांची जमीनहायवेलगत नसताना साजिद अलीमोहंमद ताहेर अन्सारी, साजिद अलीअब्दुल समाल बेलदार यांना खोटेखरेदीखत करून दिले. त्यामध्येकाही जणांना साक्षीदार केले.फिर्यादीची फसवणूक झाल्यानेमानवत न्यायालयात तक्रार दाखलकरण्यात आली. मानवत रेल्वेस्टेशनउड्डाणपूल झाल्यानंतर शासनानेअधिग्रहण केलेला पुरावा वबाळासाहेब देशमुख, त्यांच्या आईचीजमीन हायवेलगत नसताना त्यांनीबनावट खरेदीखत करून दिले, असापुरावा सादर केला. न्यायालयानेयुक्तिवाद ग्राह्य धरून गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. नाशकात “समाजवादी’चा माजी नगरसेवक हद्दपार मालेगाव – समाजवादीचे नेते व माजी नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी यांना हद्दपारीची नाेटीस देण्यात आली आहे. राजकीय दबावाखाली नाेटीस देवून पाेलिसांकडून त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आराेप डिग्निटी यांनी केला आहे. आपल्या विराेधात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. केवळ राजकीय आंदाेलनांचे विविध १६ गुन्हे दाखल आहेत. मात्र, हेतुपुरस्कर लक्ष्य करून एक प्रकारे आवाज दाबण्याचा प्रयत्न हाेत आहे. शहरात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांविराेधात पाेलिस कुठलीही कारवाई करत नाही याचे आश्चर्य असल्याचे डिग्निटी यांनी सांगितले. भिंत अंगावर पडून दांपत्यगंभीर जखमी, पतीचा मृत्यू हिंगोली – सेनगाव तालुक्यातील गुगुळपिंपरीयेथे घराची भिंत अंगावर पडून दांपत्यगंभीर जखमी झाले होते. त्यातीलजखमी व्यक्तीचा उपचार सुरुअसताना गुरुवारी सकाळी मृत्यूझाला, तर महिलेवर उपचार सुरुआहेत.
गुगुळपिंपरी येथील ज्ञानेश्वररामभाऊ कोकाटे (५०) व त्यांचीपत्नी मजूरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना शासकीय योजनेमध्येघरकुल मंजूर झाले असून नवीनघराचे बांधकाम सुरु करावयाचे होते.त्यासाठी त्यांनी जुन्या घराच्या तीनबाजूच्या भिंती पाडल्या होत्या, तरएक भिंत तशीच ठेऊन त्या बाजूनेकापड लावले होते. बुधवारी ८ रोजीरात्री ते घरात झोपले होते. रात्रीच्यावेळी अचानक त्यांच्या अंगावर भिंतकोसळली. यामध्ये दोघेही दगड वमातीच्या ढिगाऱ्याखाली दोघेही दबलेगेले. मोठा आवाज झाल्यानेपरिरातील गावकरी धावून आले.ग्रामस्थांनी तातडीने दगड व मातीहटवून गंभीर जखमी झालेल्यादांपत्याला बाहेर काढले. या घटनेचीमाहिती मिळाल्यानंतर गोरेगावपोलिस ठाण्याचे निरीक्षक व्ही. एम.झळके, जमादार अनिल भारती,नवले यांच्या पथकाने तातडीने भेटदिली. दोघांना हिंगोलीच्या शासकीयरुग्णालयात दाखल केले. मात्रउपचार सुरु असतांना ज्ञानेश्वरकोकाटे यांचा मृत्यू झाला. ३ दिवसांत २५ हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्याचे आव्हान हिंगोली – जिल्ह्यात नाफेडच्या हमीभाव खरेदीकेंद्रावर २५,७८२ शेतकऱ्यांचे सोयाबीनखरेदीचे आव्हान आहे. सोयाबीनखरेदीसाठी केवळ १२ जानेवारीच्यामुदतीचे केवळ ३ दिवस शिल्लकआहेत. त्यामुळे मुदतवाढीची प्रतीक्षा आहे. हिंगोली जिल्ह्यात खुल्या बाजारातसोयाबीनचे भाव कमी असल्यामुळेशेतकऱ्यांचा नाफेडच्या हमीभाव खरेदीकेंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी ओढाआहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइननोंदणी केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरसंदेश पाठवून त्यांना सोयाबीनविक्रीसाठी आणण्याच्या सूचना दिल्याजात आहेत. हिंगोली जिल्ह्यातील १५खरेदी केंद्रांवर १५ आॅक्टोबर रोजीखरेदी सुरू झाली. सुरूवातीपासूनआता पर्यंत ७६९९ शेतकऱ्यांची १.५४लाख क्विं. सोयाबीन खरेदी केले आहे.
चुका होतात, माझ्याकडूनही होत असतील : पंतप्रधान मोदी नवी दिल्ली – झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी आपली पॉडकास्ट मालिका ‘पीपल बाय डब्ल्यूटीएफ’ अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. गुरुवारी कामत यांनी २ मिनिटांचा ट्रेलर रिलीज केला. त्यात मोदी म्हणाले, ही माझी पहिली पॉडकास्ट मुलाखत आहे. कशी असेल माहीत नाही. पॉडकास्टमध्ये मोदींनी जगातील युद्ध स्थिती, राजकारणात तरुणांचा प्रवेश, पहिल्या व दुसऱ्या टर्ममधील अंतर यावर उत्तरे दिली. पॉडकास्ट लवकरच रिलीज होईल. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा एक भाषण केले होते. त्यात म्हणालो होतो, चुका होतात. माझ्याकडूनही होत असाव्यात. मी पण माणूस आहे, मी देव नाही, असे मोदी म्हणाले. आरक्षणातून वगळण्याचा निर्णय सरकारांचा : सुप्रीम काेर्ट नवी दिल्ली – कोट्याचा लाभ घेतलेल्या लोकांना आरक्षणातून वगळण्याचा निर्णय सरकारे घेतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्या. भूषण गवई आणि न्या. ए. जे. मसीह यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सातसदस्यीय घटनापीठाच्या निर्णयाचा हवाला देत ही टिप्पणी केली. न्या. गवई म्हणाले, ‘गेली ७५ वर्षे लक्षात घेता ज्यांना आधीच फायदे मिळाले व इतरांशी स्पर्धा करू शकतील अशा लोकांना आरक्षणातून वगळण्यात यावे, हे आम्ही आधीच सांगितले आहे. मात्र, हा निर्णय कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळाने घ्यायचा आहे. ऑगस्टमध्ये कोट्यात कोट्याबाबत निकाल देणाऱ्या घटनापीठाचा न्या. गवई हे भाग होते. त्यात त्यांनी स्वतंत्र निर्णय लिहिला होता. ते म्हणाले होते, राज्यांनी अनुसूचित जाती आणि जमातींमध्येही क्रीमी लेअर ओळखण्यासाठीचे धोरण विकसित करावे व त्यांना आरक्षणाचा लाभ देऊ नये. गुरुवारी याचिकाकर्त्याच्या वकिलांनी या निर्णयाचा दाखला देत अशा क्रीमी लेअरची ओळख पटवण्यासाठीचे धोरण आखण्याची मागणी केली. यावर कोर्ट म्हणाले, ‘ते खासदार आहेत. खासदार कायदे करू शकतात. शंभू सीमेवर शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या अंबाला – शंभू सीमेवर गुरुवारी पंजाबचे शेतकरी रेशम सिंग (५५) यांनी विष प्राशन करत जीव दिला. तरणतारण जिल्ह्यातील रेशम हे किसान मजदूर मोर्चात सहभागी झाले होते. शेतकरी नेत्यांच्या मते, सरकारच्या धोरणांनी दुखावल्यामुळे त्यांनी जीव दिला. केंद्र सरकारकडून चर्चा न करणे व मागण्या मान्य न झाल्यामुळे ते नाराज होते. यापूर्वी १४ डिसेंबरला रणजोध सिंग या शेतकऱ्यानेही विष प्राशन करून जीव दिला होता. तथापि, पंजाबच्या मोगा येथे संयुक्त किसान मोर्चाची (एसकेएम) महापंचायत झाली. यात शंभू व खनौरी सीमेवरील आंदोलनास पाठिंबा देण्याचा प्रस्ताव पारित केला. आता शुक्रवारी एसकेएमचा जत्था खनौरी सीमेवर दाखल होईल. शंभर बनावट कंपन्यांचा १०,००० कोटींचा घोटाळा नवी दिल्ली – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बेकायदेशीर परदेशी हवाला व्यवहारांच्या तपासात ९८ डमी भागीदारी कंपन्या व १२ प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला. याच्या माध्यमातून १०,००० कोटींहून अधिक रक्कम हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंडला ‘फ्रीट चार्जेस’च्या नावाने पाठवण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यवहार शेल कंपन्यांच्या नावाने उघडलेल्या २६९ बँक खात्यांमधून करण्यात आला. २ जानेवारी रोजी मुंबई, ठाणे, वाराणसी येथील ११ ठिकाणी राबवलेल्या शोध मोहिमेतून ही बाब उघड झाली. पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. झडती दरम्यान १ कोटीची रोकड व दागिने जप्त केले.