दिव्य मराठी अपडेट्स:यवतमाळमध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का, 5 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… यवतमाळमध्ये काँग्रेसला शिंदे गटाचा धक्का यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्षांसह 5 नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम केला आहे. या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
संभाजीनगरमधील एमजीएमच्या डॉक्टरवर आमदार संतोष बांगर संतापले छत्रपती संभाजीनगर येथे डेंग्यूच्या रुग्णाचे दहा दिवसाचे औषधीच्या खर्चासह रुग्णालयाचे असे सहा लाख रुपयांचे देयक मागणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी चांगलेच फटकारले. याची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. सविस्तर वाचा
रायगडावरील वाघ्या कुत्रा काढून फेकून द्या- उदयनराजे उदयनराजे भोसले यांनी किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून फेकून देण्याची मागणी केली आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून फेकून द्या. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? द्यायचा एक दणका, त्यात काय एवढे? असे ते म्हणालेत. सविस्तर वाचा कृषी मंत्री कोकाटे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य कांद्याला चांगला भाव मिळाला की, शेतकरी कांदाच लावत सुटतात. त्यानंतर कांद्याचे भाव पडतात, असे म्हणत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर थेट नाराजी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यामुळे आता कोकाटे पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरले आहेत. सविस्तर वाचा समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण, दोन ठार समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. मेहकरजवळ भरधाव कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीचा खून, नंतर स्वतः आत्महत्या लोखंडी कपाटात अंत्यविधीचे पैसे ठेवले आहेत. माझा देहदान करा, तुमची इच्छा असल्यास पत्नीचा अंत्यविधी करा. (घर काम करणाऱ्या महिलेने) सीमाने खूप सेवा केली तिला 50 हजार द्या, नाशिकच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी समोर आली आहे. सविस्तर वाचा पैशांवरून परिवहन अन् वित्त खात्यात जुंपली एसटी कर्मचाऱ्यांच्या थकित पगाराच्या मुद्यावरून परिवहन व वित्त विभागामध्ये चांगलीच जुंपल्याची चिन्हे आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आमच्या विभागाकडून गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्याकडून परस्पर आमच्या विभागाकडे पाठवली जाते असे ते म्हणालेत. यावेळी म्हणालेत. सविस्तर वाचा आमदारांचे, अधिकाऱ्यांचे पगार थांबवा- रोहित पवार सरकारकडे एसटीला द्यायला पैसे नसतील तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आधी करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना निम्मा पगार देण्यात आला आहे. यावरुन त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा सेन्सेक्स 1400 अंकांनी वाढून 75200 वर आज, आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सेन्सेक्स सुमारे 1400 अंकांच्या (1.54%) वाढीसह 75,200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर, निफ्टी देखील 450 पेक्षा जास्त अंकांनी वाढला आहे, तो 22, 850 च्या पातळीवर आहे. फार्मा आणि मेटल स्टॉकमध्ये सर्वाधिक खरेदी आहे. सविस्तर वाचा स्वारगेट अत्याचार प्रकरण: पीडितेला आर्थिक मदत स्वारगेट बस डेपोमध्ये अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीला राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. 26 वर्षीय पीडित तरुणीला राज्य सरकारच्या वतीने मनोधैर्य योजनेअंतर्गत 3 लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर केले आहे. सविस्तर वाचा माझ्या बहिणीला पुन्हा उपोषण करण्याची वेळ येऊ नये- अजित पवार माझ्या बहिणीला पुन्हा उपोषण करण्याची वेळ येऊ नये, अशी सक्त ताकीद आपण जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकार्यांना दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भोर तालुक्यातील या रस्त्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. सविस्तर वाचा
हिंगोली शहरात वाहतूक पोलिसांची कारवाई हिंगोली शहरात शहर वाहतूक शाखेच्या वतीने ड्रिंक अँड ड्राइव्ह सोबतच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच विनापरवाना वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांवर गुरुवारी ता.10 कारवाईची मोहीम हाती घेतली. यामध्ये 126 वाहनांवर कारवाई करून अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा दहशतवादी तहव्वुर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने 18 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. एजन्सीने न्यायालयाकडून 20 दिवसांची कोठडी मागितली होती. विशेष एनआयए न्यायाधीश चंद्रजित सिंह यांनी बंद खोलीत या प्रकरणाची सुनावणी केली आणि गुरुवारी पहाटे 2 वाजता निकाल सुनावला. सविस्तर वाचा 26/11 मुंबई हल्ला, प्रत्यक्षदर्शी म्हणाला- दहशतवाद्याने माझ्यावर बंदूक रोखली होती 26/11 च्या मुंबई हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी मोहम्मद तौफिक म्हणाले की, कोणालाही मारण्याचा अधिकार नाही. मी मुस्लिम आहे, तो (राणा) देखील मुस्लिम आहे. कोणालाही मारण्याचा अधिकार नाही. मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणाला भारतात आणल्याबद्दल एएनआयला दिलेल्या मुलाखतीत तौफिकने यावर भाष्य केले. सविस्तर वाचा