दिव्य मराठी अपडेट्स:महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका, दरकपातीला स्थगिती; मुंबई,ठाण्यात पावसाचा अंदाज

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्रातील जनतेचा अपमान- बावनकुळे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे. जिथे जिथे त्यांचे खासदार निवडून आले तेथील जनता आता पुढील निवडणुकीत त्यांना निवडून देणार नाही. कालच्या ठाकरेंच्या भूमिकेमुळे अनेक जण पक्ष सोडणार असल्याचा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सविस्तर वाचा औरंगजेबाची कबर गनिमी काव्याने तोडणार – कल्कीराम महाराज आदिनाथ संप्रदायाचे पीठाधीश्वर तथा हिंदू जोडो यात्रेचे प्रमुख कल्कीराम महाराज यांनी मुघल बादशहा औरंगजेबाची कबर गनिमी काव्याने तोडण्याची घोषणा केली आहे. यासाठी ते एक भला मोठा प्रतिकात्मक हातोडा घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले होते. पण… सविस्तर वाचा काँग्रेसने दिलेले स्वातंत्र्य भाजपला चालते का? – संजय राऊत काँग्रेस पक्षाने दिलेले स्वातंत्र्य भाजपला चालते का? असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर देखील त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सविस्तर वाचा वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करणारेच खरे मुसलमान- आझमी वक्फ दुरुस्ती विधेयकाला जे समर्थन करत आहेत ते खोटे मुस्लिम आहेत. खरे मुसलमान या विधेयकाच्या विरोधात आहेत. जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत ही जमीन अल्लाहच्या नावावर राहील, असे वक्तव्य समाजवादीचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे. सविस्तर वाचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करण्यात आला. काल याबाबत ठाकरे गटाने कोणतीच भूमिका स्पष्ट सांगितली नव्हती. मात्र, रात्री उशिरा लोकसभेत झालेल्या मतदानात ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करण्यात आले. सविस्तर वाचा आज मुंबईत पावसाचा अंदाज
मुंबईत आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत मागच्या चार-पाच दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. ठाणे, पालघर, रायगडलाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वीज बिल कपातीचे ‘एप्रिल फूल’ महावितरणचा वीज दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून वीज नियामक आयोगाने सर्वच प्रकारच्या वीज बिलात 7 ते 10टक्के कपात करण्याचा निर्णय 28 मार्च रोजी दिला होता. एक एप्रिलपासून त्याची अंमलबजावणीही होणार होती. हा निर्णय लागू झाला असता तर 1 ते 100 युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी 4.71 रुपये ऐवजी 4.43 रुपये दर लावला जाणार होता. सविस्तर वाचा वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर बुधवारी लोकसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. पहाटे 2 वाजता झालेल्या मतदानात 520 खासदारांनी भाग घेतला. 288 जणांनी बाजूने तर 232 जणांनी विरोधात मतदान केले. सविस्तर वाचा