दिव्य मराठी अपडेट्स:महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा! दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर…

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… राज्यात आज उष्णतेची लाट! महाराष्ट्रात आजपासून उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचून शकते. नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे, नाशिक जिल्ह्यांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त रविवारी चंद्रपुरात मुनगंटीवार समर्थक आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले होते, यावरुन मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव न घेता त्यांना सुनावले आहे. सविस्तर वाचा मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगणार MI Vs RCB सामना
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मध्ये आज मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सामना रंगणार आहे. 18 व्या हंगामातील 20 वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यात बुमराह पुनरागमन करण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 3000 अंकांनी घसरला शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 3000 अंकांपेक्षा (4%) खाली आला आहे. सुमारे 72,300 पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी 900 अंकांनी (4.50%) खाली आला आहे. तो 22,000 च्या खाली व्यवहार करत आहे. वाचा सविस्तर