जम्मू-काश्मीरमध्ये परिसीमनमुळे मतदारसंघांचे चित्र बदलले:तुल्यबळ लढती होणार, तरुण मतदार वाढल्याचाही परिणाम

श्रीनगरच्या दल सरोवराच्या किनाऱ्यावरील सायंकाळ अतिशय मनमोहक आहे. सूर्य मावळतीला आहे. शिकारे पाण्यावर हळुवार तरंगत जणू बदलत्या काश्मीरची कहाणी स्वत:च सांगू लागले आहेत. २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर स्थानिक लोक त्यास राजकीय, आर्थिक व सामाजिक पातळीवर अनुभवू लागले आहेत. एका शिकाऱ्याचे मालक अनिस अहमद राजकीय वाऱ्याबद्दल सांगतात, कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परिस्थितीत सुधारणा होत आहे. लोक निर्भयपणे काश्मीरला येत आहेत. सरोवराजवळील चहा विक्रेता जुबैर मीर म्हणाले, येथे आधी भाजप नव्हता, परंतु आता अस्तित्वात आला आहे. निवडणूक लढाईत आहे का? संघर्ष काँग्रेस-एनसी आघाडी व पीडीपीमध्ये होईल. परंतु भाजप त्यांना कमकुवत करत आहे. या भागात एम्पोरियम चालवणारा एक तरुण म्हणाला, पहिल्या टप्प्यात २४ पैकी १६ जागांवर निवडणूक होईल. त्यात केवळ ८ जागी भाजप लढणार आहे. बाकीवर लढवत आहे. या तरुणाचा इशारा अपक्ष उमेदवारांकडे होता. पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती व एनसीप्रमुख उमर अब्दुल्ला भाजपकडून प्रायोजित असल्याचे सांगितले जाते. जम्मू विद्यापीठातील निवृत्त प्रोफेसर रेखा चौधरी म्हणाल्या, येथे मतदारसंघाचे चित्र वेगळे आहे. एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. जास्त जागा जिंकून तडजोड करत सत्ता संपादन करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे पक्ष सीएम पदाचा चेहरा जाहीर करू शकलेले नाही. मतदारसंघांच्या परिसीमनमुळे बहुतांश जागांचा भूगोल बदलला. त्यामुळे निवडणूक इतिहास व ट्रेंडचेही फार महत्त्व दिसून आलेले नाही. पक्षांचे बालेकिल्ले : नॅशनल कॉन्फरन्सचे काश्मीर खोऱ्यातील केंद्रीय व उत्तर भागात चांगले संबंध आहेत. गांदरबल, हजरतबल, खानयार व सोनावारी सारख्या जागा त्यांचे बळकट बालेकिल्ले मानले जातात. पीडीपी दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग, पुलवामा, शोपियां व कुलगाममध्ये बलाढ्य दिसते. २००२ पासून पीडीपीचे येथे साम्राज्य राहिले आहे. भाजपचा गड मुख्यत्वे करून जम्मू भागात आहे. जम्मू पश्चिम, कठुआ , उधमपूर, सांब त्याचे मजबूत भाग आहेत. राजौरी-पुंछ क्षेत्रात एसटी समुदाय आणि आरक्षणामुळे महत्त्वाच्या मतदारसंघ बिनभरवशाचे झाले आहेत. नवीन आरक्षण नियमांत गुज्जर बकरवाल व डोंगराळ समुदायातील स्पर्धेचा निकाल परिणाम करताना दिसतो. काश्मीरमधील अनेक जागा पीडीपी व नॅॅशनल कॉन्फरन्स यांच्यात अडकून पडल्या आहेत. किश्तवाड, डोडा, रियासी, रामबन यासारखे मतदारसंघही जम्मूच्या वरील भागात स्थान देत नाही. येथे भाजप- काँग्रेस यांचा मुकाबला होईल. निवडणूक निकाल बदलत आला आहे. काश्मीरमधेये एनसी, पीडीपी व काँग्रेस मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी सांस्कृतिक, धार्मिक सुरक्षेला प्राधान्य देत आहे. निवडणुकीत ३ फॅक्टर जम्मू-कश्मीरचा वृत्तांत… एकूण ९० विधानसभा जागा आहेत. २४ जागी १८ सप्टेंबरला मतदान आहे. काश्मीरमध्ये १६,तर जम्मूत ८ राेजी मतदान होईल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment