सहकाऱ्यांच्या बेईमानीमुळे अमरावतीत फटका बसला:फडणवीसांची बच्चू कडूंवर टीका, नवनीत राणांचा आधुनिक झाशीची राणी असा उल्लेख
मेळघाटाने नवनीत राणा यांना ज्याप्रकारे समर्थन दिले, त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो. आमच्या सहकाऱ्यांनी धोका दिला नसता, तर फक्त मेळघाटाच्या जोरावर 16 हजारांची लीड संपवली असती. आपल्या नवनीत ताई लोकसभेत गेल्या असत्या, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता बच्चू कडू यांच्यावर टीका केली. पण आता विधानसभा निवडणुकीत मेळघाट असे मतदान करेल, की संपूर्ण अमरावतीचा रेकॉर्ड मेळघाटमध्ये तुटेल, हा विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज अमरावती येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणा यांचा आधुनिक झाशीची राणी असा उल्लेख केला. नवनीत राणा मेळघाटच्या कन्या आहेत, तर मी पण येथील मुलगा आहे. मेळघाटशी माझे नाते जुने आहे. माझ्या आजोबाचे घर चिखलदऱ्यात आहेत. मी लहानपणी इथे यायचो आणि रहायचो, असे फडणवीसांनी सांगितले. जो राम को लाये हैं, उनको आपको लाना है. हमने हमारा काम किया हैं, अब आप की बारी हैं, असे आवाहनही फडणवीसांनी केले. मविआच्या काळात मेळघाटच्या कामावर रोख देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवनीत राणा यांनी मेळघाटसाठी ज्या मागण्या केल्या, त्या पूर्ण करु. दुधाला जास्त भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यावर येथील कामावर रोख लागली. स्काय वॉकचे काम थांबवण्याचे पाप महाविकास आघाडीच्या सरकारने केले. निवडणुकीआधी आणि नंतरही नवनीत राणांनी मेळघाटशी संपर्क ठेवला. मेळघाट हा त्यांचा परिवार आहे. नेर ते खंडवापर्यंतचा रस्ता पूर्ण करायचा आहे, अशी राणांची मागणी आहे. याचे श्रेय ते मला देतात. पण कारवाई त्यांनी करुन घेतली. स्काय वॉकचेही काम पूर्ण होणार आहे. तुम्ही प्रपोजल करा. पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज मिळेल, अशी घोषणा फडणवीसांनी केली. हे ही वाचा… अमित शहा म्हणजे ‘मुन्नाभाई’मधला सर्किट:370 कलम हटवून माझ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार आहे? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल सांगोला येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी भाजप तसेच महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ‘सर्किट’ असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे. तसेच शहाजी बापू यांच्यावर देखील टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा…