‘एकनाथ खडसे…काय तुझी हि व्यथा…!’ गिरीश महाजन यांचा पलटवार:प्रफुल्ल लोढांसह एकनाथ खडसे यांचे फोटो केले पोस्ट ‘एकनाथ खडसे…काय तुझी हि व्यथा…!’ गिरीश महाजन यांचा पलटवार:प्रफुल्ल लोढांसह एकनाथ खडसे यांचे फोटो केले पोस्ट

‘एकनाथ खडसे…काय तुझी हि व्यथा…!’ गिरीश महाजन यांचा पलटवार:प्रफुल्ल लोढांसह एकनाथ खडसे यांचे फोटो केले पोस्ट

जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक युद्ध गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र प्रफुल्ल लोढा याच्या माध्यमातून या युद्धाला नवीन धार मिळाली आहे. लोढावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा दाखला देत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला होता. आता गिरीश महाजन यांनी देखील जोरदार पलटवार केला आहे. एकनाथ खडसे काय तुझे हे व्यथा असे म्हणत खडसे यांच्या एकेरी उल्लेख करून गिरीश महाजन यांनी दोन फोटो एकनाथ खडसे…काय तुझी हि व्यथा…! असे म्हणत महाजन यांनी लोढा आणि खडसे यांचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. या संदर्भात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. या पोस्टमध्ये गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांच्या सोबतचे दोन फोटो पोस्ट करून दोघांमध्ये गुलाबी गप्पा रंगला असल्याचा दावा केला आहे. प्रफुल्ल लोढा याने खडसेंवर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केला असल्याचेही महाजन यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन बिनबुडाचे आरोप या संदर्भात महाजन यांनी पोस्ट शेअर करत खडसे यांच्यावर पलटवार केला. यामध्ये महाजन यांनी म्हटले की, ‘एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय… हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात ? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे… २०१९ ते २०२२ च्या दरम्यान अश्या खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच… आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय? एकनाथ खडसे… काय तुझी हि व्यथा…!’

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *