एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवत आहेत का?:संजय राऊत यांचा सवाल; म्हणाले- अमित शहांनी त्यांना दट्टू मारायला हवा

एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवत आहेत का?:संजय राऊत यांचा सवाल; म्हणाले- अमित शहांनी त्यांना दट्टू मारायला हवा

पहलगाम हल्ला झाल्यानंतर सरकार म्हणून सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. अशावेळी गिरीश महाजन यांना सरकारचे प्रतिनिधी म्हणून काश्मिरला पाठवले होते. महाजन यांना या आधी देखील असे अनुभव आहेत. त्यामुळे दुसरे कोणीही त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नव्हती. असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या काश्मीर दौऱ्यावर टीका केली आहे. तुम्ही सरकारमधील वाद दाखवत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. एकिकडे सर्व पक्षीय बैठकीमध्ये आम्ही सरकारला पाठिंबा देत आहोत. देशावरील संकटाच्या काळात आम्ही सर्व एक असल्याचे सांगत आहोत. मात्र, सरकारमधील घटक पक्षच मतभेद दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. वास्तविक सरकार म्हणून त्या ठिकाणी वन विंडो सिस्टिम असायला पाहिजे. तिथे एकच माणूस जायला हवे होते. मात्र, एकनाथ शिंदे हे समांतर सरकार चालवत आहे का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकनाथ शिंदे ऐकायला तयार नाहीत का? असा देखील प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. किमान अशा प्रसंगी तरी एकीचे दर्शन घडायला हवे होते. आमच्या मनात देखील काश्मीर विषयी नक्कीच काही प्रश्न आहेत. मात्र, तरी देखील आम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे. ही वेळ सरकारला विरोधाची नाही, मतभेद दाखवण्याची नाही. मात्र, महाराष्ट्राचे चित्र फार वेगळे आणि दुर्दैवी असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावरून अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना दट्टा मारायला हवा, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकार पूर्ण काळजी घेत आहे जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांची पूर्ण काळजी महाराष्ट्र सरकार घेत आहे. त्यासाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. ज्यांना अशा कामाचा अनुभव आहे असे वरिष्ठ मंत्री त्या ठिकाणी गेलेले आहेत. सीमावर्ती राज्य असल्यामुळे त्या ठिकाणी केवळ बीएसएनएलचे नेटवर्क चालते. हल्ला झाला अशावेळी कम्युनिकेशन सिस्टिम बंद केली जाते. कारण त्याचा फायदा दुश्मन राष्ट्राला आणि दहशतवाद्यांना होत असतो. त्यामुळे अशावेळी सर्वांनी सरकारला समजून घ्यायला हवे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. सरकारमधील काही लोक हिंदू – मुसलमान विषय करत आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने जिल्हास्तरावर या सर्व घटनेचा निषेध करण्यात येत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील आमची चर्चा झाली आहे. या व्यतिरिक्त आम्ही काहीही करणार नाही. कारण यावेळी जे करायचे ते सरकारने करायचे आहे. सरकारमधील काही लोक हिंदू – मुसलमान विषय करत आहेत. ते अतिशय चुकीचे आहे. संकटात पर्यटकांना काश्मीरमधील मुस्लिम बांधवांनी मदत केली, ते विसरता येणार नाही. त्यामुळे आता हे धंदे बंद करा आणि हा विषय गांभीर्याने घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. सरकार दुश्मनांशी दोन हात करण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही सरकार सोबत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आज बाबासाहेबांसारखे नेते नाही बाळासाहेब ठाकरे सरकारमध्ये नसले तरी देखील त्यांच्या बोलण्यात बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा जास्त ताकद होती. ते रेड कार्पेट वर चालणारे नेते नव्हते. मात्र, आज दुर्दैवाने तसे नेते नाहीत. त्यामुळे सरकार काय करत आहे? याकडे आमचे लक्ष आहे. अंबरनाथ यात्रे संदर्भात पाकिस्तानी दहशदवाद्यांनी धमकी दिल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी उत्तर दिले होते. तसे उत्तर देणारा आज कोणीही नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. संकटाच्या काळात आम्ही सरकारच्या पाठीशी:संजय राऊत म्हणाले- अशा वेळी इंदिरा गांधींची आठवण येते; विशेष अधिवेशन घेण्याची मागणी देशावरील असलेल्या या संकटाच्या काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जो काही निर्णय घ्यायचा तो सरकारच घेत असते. मात्र आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सर्व पक्षीय बैठकीत देखील हाच सूर असतो. मात्र, या काळात विरोधी पक्षाने दिलेल्या सूचनांचे पालन देखील सरकारने करावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment