एकनाथ शिंदेंना भेटल्यावर बदलला सूर:नाराज विजय शिवतारे म्हणाले – एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मला जवळचे

एकनाथ शिंदेंना भेटल्यावर बदलला सूर:नाराज विजय शिवतारे म्हणाले – एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मला जवळचे

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या आणि यात महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला, मात्र, यात महायुतीमधील तिन्ही पक्षातील काही आमदार नाराज असल्याचे समोर आले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने ही नाराजी आहे. यात शिवसेना शिंदे गटातील अनेक आमदारांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त देखील केली. यात आमदार विजय शिवतारे यांनी परखड भाषेत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता त्यांचा सूर काहीसा बदलला असल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आमदार विजय शिवतारे यांनी आपली भूमिका बदलली असल्याचे दिसत आहे. विजय शिवतारे म्हणाले, मी नाराज नव्हतो. एकनाथ शिंदे यांचा विश्वासू सहकारी हे पद मला जास्त जवळचे आहे, असे म्हणत त्यांनी आपला नाराजीचा सूर बदलला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मंत्रिपद मिळेल म्हणून कुटुंबातील सगळे लोक नागपुरात आले
नागपूर येथे सुरू असलेले विधिमंडळ अधिवेशन सोडून विजय शिवतारे हे त्यांच्या मतदारसंघात निघून गेले होते. यावर बोलताना शिवतारे म्हणाले, मी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आलो करण दोन तीन दिवसात जे काही झाले त्यामुळे माझा जरा मूड गेला होता. पात्रता असताना देखील डावलले गेले, डावलण्यामागे एकनाथ शिंदे यांची कारणे असतील. मला मंत्रिपद का नाकारले मला माहीत नाही. मंत्रिपद मिळेल म्हणून कुटुंबातील सगळे लोक नागपुरात आले. एखादा माणूस निधन झाल्यावर जसा मातंग होतो तसा मातंग झाला, त्यामुळे मी अस्वस्थ होतो. कार्यकर्ते गाड्या घेऊन आले होते, त्यांचा अपेक्षाभंग झाला. कॅपिसिटी होती म्हणून वाटत होते मंत्रिपद मिळेल, पण तसे झाले नाही. मंत्री पद मिळणार नाही हे दोन दिवसापूर्वी मला सांगितले असते तर शांत राहिलो असतो, उलट मी थांबून दुसऱ्याला मंत्रिपद दिले असते. 375 गाड्या तब्बल दहा तासांचा प्रवास करून नागपूरला आल्या
पुढे बोलताना विजय शिवतारे म्हणाले, मला मंत्रिपद मिळेल, अशी माझ्या घरच्यांना अपेक्षा होती. शपथविधी सोहळ्यासाठी 375 गाड्या तब्बल दहा तासांचा प्रवास करून नागपूरला आल्या होत्या, कार्यकर्ते देखील खूपच आग्रही होते. मात्र, मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी मी थोडा भावूक झालो आणि अनेक गोष्टी बोलून गेलो. पण माझ्या मनात असे काही नाही, पुढील काळात एकनाथ शिंदे जे पद देतील ते मला मान्य असेल, असे म्हणत विजय शिवतारे यांनी आपली नाराजी दूर झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment