एकनाथ शिंदेंची प्रकृती गंभीर, वेडवाकडं बोलू नका- संजय राऊत:शिंदेंच्या हातात काहीही नाही; त्यांना कोणते खाते द्यायचे हे मोदी-शहांच्या हातात
एकनाथ शिंदेंना गृह आणि महसूल खाते हे ते ठरवणार आहेत का का ते ठरवू शकतात का नाही. हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ठरवणार यांच्यासमोर कोणती हाडके टाकायची आणि त्यांनी काय चघळायचे. एकनाथ शिंदेंच्या हातात काहीही नाही. त्यांच्याकडे फक्त रुसवे फुगवे आणि मग शरणागती यापलीकडे काहीही नाही, असा म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. त्यांच्याविषयी काहीही वेडवाकडं बोलू नका. त्यांची प्रकृती फार नाजूक आहे. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले, त्यांनाही ते भेटले नाही. म्हणजे त्यांची किती प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या हाताला पट्टी लावली आहे. अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही त्रास देऊ नका. 5 डिसेंबरला ते शपथविधीसाठी येतात का की त्यांना हवाई रुग्णवााहिकेतून त्यांना यावे लागेल. अशा चिंतेत अनेक लोक आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकांची गरज आहे. हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदी पाठवत आहेत. यांच्या अंगातील भूत फडणवीास काढणार असतील तर चांगलच आहे. बावनकुळे राज्यपाल आहेत का? संजय राऊत म्हणाले की, बहुमत असून देखील दावा का केला नाही? मुख्यमंत्री कोण आणि भाजपचा विधीमंडळाचा नेता कोण? या संदर्भात निर्णय झालेला नाही. एवढा मोठा पक्ष असून निर्णय घेता येत नाही. काळजीवाहू सरकार अशी संकल्पना संविधानामध्ये नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 तारखेलाच संपली आहे. त्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू व्हायला पाहिजे होती. हे त्यांचे भाडोतरी कायदेपंडित काहीही कागद आणून दाखवतील. निकाल लागून 10 दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. यांना राज्यपालांचे अधिकार दिलेले आहेत का? हे सांगत आहेत की आम्ही 5 तारखेला शपथ घेऊ. चंद्रशेखर बावनकुळे हे काय राज्यपाल आहेत का? हा निर्णय राज्यपालांचा असतो. न्यायमूर्ती चंद्रचूड हेच जबाबदार संजय राऊत म्हणाले की, सरकार स्थापनेचा दावा करायला देखील अद्याप कुणीही तयार नाही. हे नेमकं कुणाला घाबरत आहेत, कशाकरता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीये. ही अतिशय गंभीर बाब आहे. या एकंदरीत सर्व परिस्थितीला न्यायमूर्ती चंद्रचूड हेच जबाबदार आहे. असेही संजय राऊत म्हणाले.