‘अन्नाची कदर, शेतकऱ्यांचा आदर’:शिळ्या, उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणपुरक उपक्रम

‘अन्नाची कदर, शेतकऱ्यांचा आदर’:शिळ्या, उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणपुरक उपक्रम

‘अन्नाची कदर, शेतकऱ्यांचा आदर’ हा स्वच्छता,आरोग्य व पर्यावरणास पुरक ठरणारा उपक्रम कौतुकास्पद असून ही भावना अधिकाधिक वाढीस लागून जागरूकता निर्माण व्हावी, याकरिता सर्वांनी प्रयत्नरत राहावे,असे मनोगत मनपाच्या सहाय्यक आयुक्त दिप्‍ती गायकवाड यांनी व्यक्त केले. सदर उपक्रमासाठी छत्रीतलाव नजिकच्या उड्डाणपुलाजवळ जमिनीवर खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्याचे पूजन करताना गायकवाड बोलत होत्या. गणेशोत्सव, माता महालक्ष्मी आणि त्यानंतर येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी महाप्रसाद होतात. या महाप्रसादानंतर शिल्लक राहिलेल्या अन्नाची योग्य मार्गाने विल्हेवाट लावण्यासाठी एम.एच.-२७-एटीएस ग्रुप्सतर्फे हा स्तुत्य उपक्रम सात वर्षापासून सुरळीत सुरू आहे. यावेळी, सर्वात आधी सहाय्यक आयुक्त दिप्‍ती गायकवाड व जागरूक नागरिक संदीप गुल्हाने यांच्या हस्ते धरतीमातेचे व अन्नदेवतेचे पूजन करून गोळा केलेले अन्न धरतीमातेला अर्पण करण्यात आले. महाप्रसादानंतर हमखास शिल्लक राहिलेले अन्न इतरत्र कुठेही टाकल्या जाऊन अस्वच्छता, दुर्गंधी पसरू नये तसेच कुठेही टाकण्यात येणाऱ्या अन्नामुळे मोकाट जनावरे यांना अटकाव व्हावा, यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला. यावेळी, दस्तुर नगर झोन कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक कुंदन हडाले, स्‍वास्‍थ निरीक्षक धनिराम कलोसे, प्रसाद कुलकर्णी, मनिष हडाले, योगेश कंडारे, मनिष नकवाल, धर्मेंद्र ढीके, मुन्ना महल्ले, पृथ्वी पांडे, ऋग्वेद घुरडे, किशोर कडु आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी प्रतिसाद स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणास पुरक ठरणाऱ्या या उपक्रमाला पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळाला. शहरातील जागरूक व स्वच्छताप्रिय नागरिकांनी प्रमोद पांडे ८९७५५२६९६८ यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अन्न संकलित करण्यात आले. आधी गरजू आणि भुकेल्यांना सन्मानाने अन्न देण्यात आले. त्यानंतर उरलेले अन्न आज छत्री तलाव पुलालगत धरतीमातेल अर्पण करण्यात आले.

​‘अन्नाची कदर, शेतकऱ्यांचा आदर’ हा स्वच्छता,आरोग्य व पर्यावरणास पुरक ठरणारा उपक्रम कौतुकास्पद असून ही भावना अधिकाधिक वाढीस लागून जागरूकता निर्माण व्हावी, याकरिता सर्वांनी प्रयत्नरत राहावे,असे मनोगत मनपाच्या सहाय्यक आयुक्त दिप्‍ती गायकवाड यांनी व्यक्त केले. सदर उपक्रमासाठी छत्रीतलाव नजिकच्या उड्डाणपुलाजवळ जमिनीवर खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्याचे पूजन करताना गायकवाड बोलत होत्या. गणेशोत्सव, माता महालक्ष्मी आणि त्यानंतर येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी महाप्रसाद होतात. या महाप्रसादानंतर शिल्लक राहिलेल्या अन्नाची योग्य मार्गाने विल्हेवाट लावण्यासाठी एम.एच.-२७-एटीएस ग्रुप्सतर्फे हा स्तुत्य उपक्रम सात वर्षापासून सुरळीत सुरू आहे. यावेळी, सर्वात आधी सहाय्यक आयुक्त दिप्‍ती गायकवाड व जागरूक नागरिक संदीप गुल्हाने यांच्या हस्ते धरतीमातेचे व अन्नदेवतेचे पूजन करून गोळा केलेले अन्न धरतीमातेला अर्पण करण्यात आले. महाप्रसादानंतर हमखास शिल्लक राहिलेले अन्न इतरत्र कुठेही टाकल्या जाऊन अस्वच्छता, दुर्गंधी पसरू नये तसेच कुठेही टाकण्यात येणाऱ्या अन्नामुळे मोकाट जनावरे यांना अटकाव व्हावा, यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला. यावेळी, दस्तुर नगर झोन कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक कुंदन हडाले, स्‍वास्‍थ निरीक्षक धनिराम कलोसे, प्रसाद कुलकर्णी, मनिष हडाले, योगेश कंडारे, मनिष नकवाल, धर्मेंद्र ढीके, मुन्ना महल्ले, पृथ्वी पांडे, ऋग्वेद घुरडे, किशोर कडु आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी प्रतिसाद स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणास पुरक ठरणाऱ्या या उपक्रमाला पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळाला. शहरातील जागरूक व स्वच्छताप्रिय नागरिकांनी प्रमोद पांडे ८९७५५२६९६८ यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अन्न संकलित करण्यात आले. आधी गरजू आणि भुकेल्यांना सन्मानाने अन्न देण्यात आले. त्यानंतर उरलेले अन्न आज छत्री तलाव पुलालगत धरतीमातेल अर्पण करण्यात आले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment