फडणवीस औरंगजेबाइतकेच क्रूर शासक:त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय- हर्षवर्धन सपकाळ, म्हणाले- शिवेंद्रराजेंना पक्ष सोडावा

फडणवीस औरंगजेबाइतकेच क्रूर शासक:त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय- हर्षवर्धन सपकाळ, म्हणाले- शिवेंद्रराजेंना पक्ष सोडावा

देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर शासक आहेत. त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचा आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कॉंग्रेसला काहीशे अडचणीचे दिवस आले आहेत. हे नाकारता येणार नाही. मात्र ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. कॉंग्रेसच्या विचारधारेला मानणारी जनता या ठिकाणी आहे. त्यामुळे येणार्‍या काळात पक्ष संघटना पुन्हा वाढलेली दिसेल. नेमके काय म्हणाले सपकाळ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, औरंगजेब हा क्रुर विचाराचा होता. त्यांने स्वत:च्या वडीलांना जेलमध्ये टाकले. स्वत:च्या मोठा भाऊ जो संविधानाच्या विचाराचा होता दाराशिखा याचा खून केला.खूनच केला नाहर तर त्यांचे मुंडके कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवले. लहान भावाला पागल म्हणत विषप्रयोग करत त्यांची हत्या केली. औरंगजेब सदा कदा धर्माच आधार घेत होता. तो कधीच हजला गेला नाही.हा क्रुर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रुर शासक आहेत. तेही धर्माच आधार घेत आहेत. मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या होत आहे. जिथे खासदारांच्या लेकी बाळी सुरक्षात नाही. हा प्रकार दुर्दैवाने महाराष्ट्रात सुरू आहे. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एक सारखाच आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो, हे त्या ठिकाणी दिसून येते. औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका, असे सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. भाजपमध्ये राहू नये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे, तुम्ही राजीनामा द्यावा, असे म्हणत त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. तर तुम्ही ज्या पक्षात आहात तो पक्ष शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात आहे. तुम्ही या पक्षात राहू नये. छत्रपतींना बदनाम करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र- शिवेंद्रराजे भोसले मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच आता काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असते, असा आरोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील असलेले भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राजकारणासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करतात आणि नंतर जातीयवादी पक्ष म्हणतात. पण, आपण हा खोटारडेपणा ओळखला पाहिजे. काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु असते. त्याचा आपण सर्वांनी अभ्यास करायला हवा, असे शिवेंद्रराजे म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment