दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा:17 जखमी; उद्या देशव्यापी ट्रॅक्टर मोर्चा, 101 शेतकऱ्यांचा जथ्था जखमींची संख्या वाढल्याने थांबला
पंजाब-हरियाणातील १०१ शेतकरी दिल्लीकडे कूच करू शकले नाहीत. पंजाबच्या पतियाळा जिल्ह्याची सीमा ओलांडण्याचा शनिवारी त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी अडवले. समजूत घालून त्यांना परत जाण्यास सांगितले. पण आंदोलक बॅरिकेड्स ढकलून पुढे जाऊ लागले. पोलिसांशी त्यांची धक्काबुक्की झाली. अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. वॉटर कॅनने पाण्याचा माराही केला. यात सुमारे १७ आंदोलक शेतकरी जखमी झाले. यादरम्यान शंभू सीमेवर लुधियानातील एका शेतकऱ्याने विषारी आैषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचे नाव जोधसिंह असल्याचे सांगितले जाते. शेतकरी नेते तेजवीरसिंह यांनी सांगितले की, जोधाची प्रकृती गंभीर आहे. जखमींची संख्या वाढत असल्याने शेतकऱ्यांनी तूर्त रस्त्यातच थांबण्याचा निर्णय घेतला. शेतकरी मजदूर मोर्चाचे महासचिव सरवनसिंह पंधेर म्हणाले, १६ डिसेंबर रोजी पंजाबचा अपवाद वगळता देशभर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल. १८ डिसेंबरला पंजाबमध्ये रेल रोको करणार आहोत. आरोप- केमिकलयुक्त पाणी, बॉम्बही फेकले पंधेर म्हणाले, शेतकऱ्यांवर केमिकलयुक्त पाणी, बॉम्ब फेकण्यात आले. त्यामुळे काही जणांची प्रकृती गंभीर आहे. तर पोलिस म्हणाले, केमिकलयुक्त