शेतकरी आंदोलन 2.0:शेतकऱ्यांची ताकद दाखवावी लागेल, चार लाख ट्रॅक्टरने घेरणार- टिकैत, 13 मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा 18 वा दिवस

एमएसपीसह १३ मागण्यांबाबत १३ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन-२ ला शुक्रवारी १० महिने पूर्ण झाले. या वेळी शंभू व खनौरी हद्दीत शेतकऱ्यांनी सरकारचे पुतळे जाळून संताप व्यक्त केला. शेतकरी नेते सर्वनसिंग पंधेर यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी १२ वाजता १०१ शेतकऱ्यांचा मर्जिवडा गट शंभू सीमेवरून दिल्लीकडे कूच करेल. १६ डिसेंबर रोजी देशभरात जिल्हास्तरावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) नेते राकेश टिकैत आणि हरींद्र लखोवाल १८ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांना भेटण्यासाठी खनौरी सीमेवर पोहोचले. टिकैत म्हणाले, ‘दिल्लीला पुन्हा एकदा ४ लाख ट्रॅक्टरची गरज आहे. हरियाणाचे भाजप खासदार जांगडांच्या वक्तव्याने वाद हरियाणाचे भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केले. जांगडा म्हणाले की, शेतकरी आंदोलनादरम्यान टिकरी आणि सिंघू सीमेवरील गावातून ७०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. उपोषण सोडण्यासाठी डल्लेवालांना समजवा : कोर्ट पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर पाय रोवून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्ज्वल भुइयां यांच्या पीठाने शंभू सीमा त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्यास नकार दिला. न्यायालयाने प्रकरणात स्थापन उच्चस्तरीय समितीला निर्देश दिले की, त्यांनी शेतकऱ्यांना समजून सांगावे की, आंदोलन महामार्गाऐवजी अन्य ठिकाणी करावे किंवा काही काळ स्थगित करावे. डल्लेवाल यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत पंजाब सरकारला निर्देश जारी केले की, त्यांनी त्वरित सरकार आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी शेतकरी नेते डल्लेवाल यांना भेटून त्यांना आमरण उपोषण मागे घेण्यासाठी समजून सांगावे. सुप्रीम कोर्टाने पंजाब सरकारलाही सांगितले की, उपोषण सोडवण्यासाठी कोणती बळजबरी करू नये. हरियाणा सरकारला बळाचा वापर न करण्यास सांगितले. हिंमत कमी नको :डल्लेवाल डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांच्या मते, कधीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. डल्लेवाल यांचे वजन १२ किलोने कमी झाले आहे. रक्तदाब आणि साखर सतत कमी होत आहे. जगजितसिंग डल्लेवाल ३ दिवसांनी ट्रॉलीतून मंचावर आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment